घरमुंबईगेट परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

गेट परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

Subscribe

गेट परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ८,८२,६८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.

मुंबई आयआयटीकडून घेण्यात येणार्‍या ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२१ अर्थात ‘गेट’ परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेट परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ८,८२,६८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग अभ्यासासाठी ‘गेट’ परीक्षा महत्त्वाची असते. देशभरातून होणार्‍या या स्पर्धेसाठी यंदा तब्बल ८ लाख ८२ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यावर्षी ८.५९ लाख उमेदवरांनी नोंदणी केली होती. यावर्षी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. २ लाख ८८ हजार ३७९ विद्यार्थीनींनी या परीक्षेला नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या १० हजारांनी अधिक आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४,१९६ विद्यार्थ्यांनी नव्या ह्युमॅनिटी विषयासाठी नोंदणी केली आहे. गेटची परीक्षा ६, ७, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. परीक्षेचा निकाल २२ मार्च रोजी जाहीर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -