अजिंक्यच्या मुलीचं नामकरण झालं; फोटोसुद्धा केला शेअर

अजिंक्य-राधिकाने आपल्या नन्ही परीचा फोटो शेअर करत तिचे नाव सुद्धा चाहत्यांना सांगितलं आहे.

Mumbai
radhika_rahane_instagram_1570447711

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ५ ऑक्टोबर रोजी राधिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. क्रिकेटपटू हरभजन सिंग याने अजिंक्य बाबा झाल्याची बातमी सोशल मीडियावर दिली होती. अजिंक्य-राधिकाने आपल्या नन्ही परीचा फोटो शेअर करत तिचे नाव सुद्धा चाहत्यांना सांगितलं आहे.

आर्या अजिंक्य रहाणे

अजिंक्य-राधिकाने आपल्या गोंडल मुलीचे नाव आर्या असे ठेवले आहे. आपल्या चाहत्यांसाठी अजिंक्यने आपल्या नन्ही परीचा फोटो सोशल इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान मुलीच्या जन्माच्या वेळी अजिंक्य दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त होता. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर अजिंक्यने पत्नी राधिका आणि मुलीला भेट दिली. त्यावेळचा फोटोसुद्धा अजिंक्यने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण त्यावेळी त्याच्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे अजिंक्यची नन्ही परी कशी दिसते? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. पण आता पहिल्यांदाच अजिंक्यने त्याच्या मुलीचा म्हणजेच आर्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अजिंक्यच्या चाहत्यांनी खूप कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

View this post on Instagram

Aarya Ajinkya Rahane ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

View this post on Instagram

Hello ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

View this post on Instagram

❤️❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on