घरमुंबई'काँग्रेसचे हमाल, दे धमाल'; शेलारांची शिवसेनेवर टीका

‘काँग्रेसचे हमाल, दे धमाल’; शेलारांची शिवसेनेवर टीका

Subscribe

राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. मात्र, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. मात्र, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शिवसेनेवर टीका केली आहे. ‘देशातील तमाम हिंदूंसाठी हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको? अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न. सत्तेत पहा कशी कमाल! काँग्रेसचे हमाल दे धमाल’, असे आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

- Advertisement -

आशिष शेलार यांनी या ट्विटनंतर आणखी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी देखील शिनसेनेवर निशाणा साधला. ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांचे अभिनंदन! काहींचा विधेयकाला विरोध होता. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले. काहीजण जनपथला घाबरुन सभागृहात पळाले आणि फसले’, असे शेलार म्हणाले.

- Advertisement -


हेही वाचा – वरिष्ठ नेत्यांना तिकीट नाकरण्याचा निर्णय राज्याचा; पकंजा मुंडेची फडणवीसावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -