बॉम्बच्या अफवेने दादर परिसरात खळबळ; मात्र नंतर कळलं…

Mumbai
Bag found on Tilak Bridge
टिळक पुलावर संशयास्पद बॅग सापडली

दादरच्या टिळक पुलावर एक संशयास्पद बॅग आढळल्यामुळे खळबळ उडाली. बॅगमध्ये काही बॉम्ब सदृश्य वस्तू असेल यामुळे लोकांमद्ये भितीचे वातावरण पसरले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक पथाने देखील घटनास्थळी धाव घेतली असता बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये जेवणाचा डब्बा आणि मोबाईल चार्जर सापडला. बॅगमध्ये काहीही संशयास्पद वस्तू नसल्याचे पाहून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बॅगमध्ये सापडले जेवणाचे डबे

दादरच्या टिळक पुलावर संशयास्पद मोठी बॅग सापडली. या पुलावरुन जाणाऱ्या प्रवाशांनी ही बॅग पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयास्पद बॅग असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. त्यामुळे पुलावर ट्राफिक जाम झाले होते. बॅगचे वजन जास्त होते तसंच निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे संशयास्पद बॅग सापडल्याने पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले.

स्विगीची बॅग, डिलिव्हरी बॉयचा शोध सुरु

बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पाहिले असता ती बॅग स्विगीची होती. बॅगला खोलून पाहिले असता त्यामध्ये स्विगिवरुन ऑर्डर केलेले जेवणाचे डबे, बिल आणि मोबाईलचा चार्जर सापडला. बॅगेत काहीच संशयास्पद वस्तू नसल्याचे पाहून घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या पोलिसांकडून बॅग कोणाची होती याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी असा अंदाज वर्तवला आहे की, ‘स्विगिचा डिलिव्हरी बॉय या पुलावरुन बाईकने फास्ट जात असताना त्याची बॅग पडली असावी.’