घरCORONA UPDATECorona Impact: भाजप नगरसेवकांचे एक महिन्यांचे मानधन 'पीएम केअर फंड'ला

Corona Impact: भाजप नगरसेवकांचे एक महिन्यांचे मानधन ‘पीएम केअर फंड’ला

Subscribe

भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील सर्व नगरसेवक आणि नामनिर्देशित नगरसेवकांचे यांचे एक महिन्याचे मानधन तथा वेतन करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ‘पीएम केअर फंड’मध्ये जमा करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी पत्रच त्वरीत देण्यासाठी भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि महापालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांना दिले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन करोनासंदर्भातल मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतलेला असताना, भाजपने पीएम केअर फंडला देवून या महामारीतही राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.

prabhakar shinde
प्रभाकर शिंदे, मुंबई महानगरपालिका भाजप गटनेते

करोना विषाणुचा प्रसार आता संपूर्ण जगात होवू लागला असून आता भारताही हा आजार अधिक फोफावू लागला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत ३२० रुग्णांना याची बाधा झालेली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे या आजाराचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार, आमदार तसेच खासदार आणि मंत्र्यांनी आपले वेतन तथा मानधन करोनाच्या आपत्ती निवारणासाठी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवक व दोन नामनिर्देशित नगरसेवक यांचे एक महिन्याचे मानधन केंद्र सरकारच्या ‘पीएम केअर फंड’मध्ये जमा करण्याचा निर्णय घेत तशाप्रकारचे पत्रच त्यांनी महापालिका आयुक्त तसेच महापालिका चिटणीस यांना सादर केले आहे.

- Advertisement -

यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी महापौरांना यांना पत्र पाठवून आपले एक महिन्याचे मानधन करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडे सुपूर्त करावे,असे कळवले आहे. त्याबरोबरच महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शिवसेनेचे नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन हे मुख्यमंत्री निधीला देण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे करोनासंदर्भातील मदत निधीवरून शिवसेना आणि भाजपात वाद सुरु झाला असून यातही राजकारण केले जात असल्याचे पहायला मिळत आहे.

- Advertisement -

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, जेव्हा जेव्हा अशाप्रकारे आर्थिक मदतीचे आवाहन केले, तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस आदी पक्षांनी मुख्यमंत्री निधीत कधीही रक्कम जमा केली नाही. तर पक्षाच्यावतीने निधी गोळा करून त्याचे स्वतंत्र वाटप केले. त्यामुळे स्वत: सत्तेत असतानाही जर शिवसेना मुख्यमंत्री निधीला पैसे देणार नसेल तर मग त्यांनीही आमच्याकडून तशी अपेक्षा ठेवू नये. ‘पीएम केअर फंड’ला दिलेला निधी मुंबईसह संपूर्ण देशात वापरला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेने जो पायंडा पाडला त्याच पावलावर आम्ही चाललो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -