धारावीपाठोपाठ इर्ला नाल्यावरील कारवाईत पालिका पथकावर हल्ला

विलेपार्ले पश्चिम परिसरात असणाऱ्या नेहरु नगरमधील पाच अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पालिका पथकावर हल्ला करण्यात आला आहे.

Mumbai
Bmc vandalised illegal construction in vilre parle
धारावीपाठोपाठ इर्ला नाल्यावरील कारवाईत पालिका पथकावर हल्ला

धारावीतील मुख्याध्यापक नाल्यावरील अतिक्रमणे तोडताना महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या अभियंत्यांना मारहाण आणि धक्काबुक्कीची घटना घडल्यानंतर बुधवारी ईर्ला नाल्यावरील बांधकामे तोडताना महापालिकेच्या पथकावर मसाला पाणी फेकण्याचा प्रकार घडला आहे. मात्र या प्रकारानंतरही के-पश्चिम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी धडक कारवाई करत तब्बल २५ अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला आहे.

२५ अनधिकृत बांधकामांवर करण्यात आली कारवाई

विलेपार्ले पश्चिम परिसरात असणाऱ्या नेहरु नगरमधील ५ अनधिकृत बांधकामांसह वाढीव स्वरुपाच्या २५ अनधिकृत बांधकामांवर बुधवारी महापालिकेच्या के-पश्चिम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महापालिकेचे ३६ कामगार – कर्मचारी – अधिकारी सहभागी झाले होते. या अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. या कारवाईदरम्यान २० पोलीसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. या कारवाईसाठी १ जेसीबी, २ डंपर आणि इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. या कारवाईमुळे इर्ला नाल्याच्या प्रवाहात उद्भवलेली अतिक्रमणे आणि अडथळे दूर झाल्याने येत्या पावसाळयात लगतच्या परिसरातील पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार आहे, अशीही माहिती  ’के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.


हेही वाचा – मुंबई मनपाचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

हेही वाचा – पालिकेत अनधिकृत बांधकामांच्या ऑनलाईन तक्रारी बंद!


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here