घरदेश-विदेशगर्लफ्रेंडच्या मृत्यूप्रकरणी इस्राईली नागरिकावर गुन्हा

गर्लफ्रेंडच्या मृत्यूप्रकरणी इस्राईली नागरिकावर गुन्हा

Subscribe

सेक्स करताना गुदमरुन मृत्यू झाला होता मृत्यू - फॉरेंसिक सायबर लॅब रिपोर्ट

गर्लफ्रेंडच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका २३ वर्षीय इस्राईली नागरिकावर खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागीलवर्षी गर्लफ्रेंडसोबत मुंबईच्या एका हॉटेलरुमध्ये सेक्स करत असताना तिचा मृत्यू झाला होता. या फॉरेंसिक सायबर लॅब रिपोर्ट पोलिसांना मिळाल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. ओरिरॉन याकॉव असे या तरुणाचे नाव असून मागीलवर्षी तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईला फिरण्यासाठी आलेला. त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेंडचा गुदमरुन मृत्यू झाला होता. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. सध्या याकॉव इस्त्राईल येथे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कसा घडला प्रकार

मागीलवर्षी मार्च महिन्यात ओरिरॉन आणि त्याची २० वर्षीय गर्लफ्रेंड इस्त्राईलहून मुंबईला टूरिष्ट व्हिसावर फिरण्यासाठी आले होते. मुंबईत राहण्यासाठी यांनी एक हॉटेल बूक केले होते. या हॉटेलमधील एका खोलीत सेक्स करताना त्याने गर्लफ्रेंडच्या मानेवर अधिक जोर दिला. तिने प्रतिकार केला असला तरी त्याने जबरदस्ती केली. त्यामुळे तीला श्वास घेता आला नाही यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला होता. महिलेला रुग्णालयात नेल्यावर तीला मृत घोषीत करण्यात आले. शवविच्छेदनानंतर यामुलीचे कुटुंबीय तीचा मृतदेह परत इस्त्राईला घेऊन गेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -