घरट्रेंडिंगतर कराचीतच दाऊदचा 'गेम' वाजला असता, दर्ग्याबाहेर अनेक दिवस लागली होती फिल्डिंग

तर कराचीतच दाऊदचा ‘गेम’ वाजला असता, दर्ग्याबाहेर अनेक दिवस लागली होती फिल्डिंग

Subscribe

छोटा राजन एनवेळी नेपाळच्या खासदाराने दाऊदला टीप दिल्याने एनवेळी बदललेल्या प्लॅनमुळे चिडला होता

गॅंगस्टर इजाझ लकडावालाने मुंबई पोलिसांकडे केलेल्या खुलाश्यात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. छोटा राजनच्या हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकी मल्होत्रा हा दहा जणांसह कराचीच्या दर्ग्याबाहेर अनेक दिवस टार्गेट करून होता. दाऊद इब्राहिमला मारण्याचा कट १९९८ मध्ये त्याने रचला होता. मुंबई क्राईम ब्रांच (गुन्हे शाखे)ने लकडावालाला जानेवारीत अटक केली आहे. त्यानंतर लकडावालाने अनेक मोठे खुलासे मुंबई पोलिसांसमोर केले आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त देत लकडावालाच्या संपुर्ण चौकशी दरम्यानच्या गोष्टींचा उलघडा केला आहे.

कराचीच्या दर्ग्याबाहेर ठोकला होता तळ
छोटा राजन हा दाऊद इब्राहिमच्या तिसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर भारतातील गुप्तचर संघटनांच्या मदतीने दाऊदला मोठा झटका देण्याच्या तयारीत होता. त्याच दहा जणांच्या टीममध्ये मी देखील होतो असे लकडावालाने स्पष्ट केले आहे. या टीमचे नेतृत्व हिटमॅन विकी करत होता. तर विकीसोबत फरीद तनाशा, बाळु डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे, बाबा रेड्डी आणि इजाझ लकडावाला यांचा समावेश या दहा जणांच्या टीममध्ये होता. दाऊद आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर काही धार्मक विधी करण्यासाठी दर्ग्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. म्हणूनच विकीच्या नेतृत्त्वातील टीम दर्ग्याच्या बाहेरच अनेक दिवस तळ ठोकून होती.

- Advertisement -

सगळा गेम पलटला

दाऊदला मदत करणाऱ्या नेपाळचे खासदार मिर्झा दिलशाद यांनी डी कंपनीला या सगळ्या कटाबाबतची टीप शेवटच्या क्षणी दिली. त्यामुळे दाऊद या हल्ल्यातून बचावला. संतापलेल्या छोटा राजनने त्याच वर्षी बेग यांच्याही हत्येचा कट रचला. लकडावालाने मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत अतिशय धक्कादायक अशा माहितीचा उलघडा केला आहे. लकडावाला जवळपास २० वर्षे सातत्याने आपली ठिकाणे बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पळत होता. त्यादरम्यान डी कंपनीपासून ते छोटा राजन अशा गॅंगसाठी काम करून त्याने स्वतः खंडणीवसुलीचे रॅकेट सुरू केले. गेल्या वर्षी लकडावालाची मुलगी शिफा हिच्या खोट्या पासपोर्ट प्रकरणातील अटकेनंतर लकडावाला मुंबई पोलिसांच्या सापळ्यात अडकला. दाऊद आणि छोटा शकील यांच्यात असणाऱ्या संबंधांबाबतही लकडावालाने काही खुलासे केले आहेत. क्राईम ब्रांचला या दोघांमधील संबंधांबाबत माहिती दिल्यानंतर लकडावालाला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यामध्ये लकडावालाचा जीव जाता जाता वाचला. पॉईंट ब्लॅंक रेंजवरून हा वेळा लकडावालाच्या छातीवर गोळीबार करण्यात आला. पण त्या हल्ल्यातून लकडावाला थोडक्यात बचावला.

ताविजाने झालो ट्रॅक

माझा सहकारी सलीम पेनवालाने मला संपर्क साधून अजमेरचा एक ताविज देणार असल्याचे सांगितले. छोटा शकीलच्या माणसांचा पाठलाग सुरू होऊ शकतो या भीतीने मी भेटायला गेलो नाही. माझ्या पत्नीला मी हा ताविज आणण्यासाठी पाठवले. तसेच थेट घरी न येण्याचाही सल्ला दिला होता. पण पत्नी तो सल्ला विसरली आणि त्यामुळेच छोटा शकीलला मला ट्रेस करणे शक्य झाले. त्यानंतर मात्र लकडावालाने कॅनडात पळ काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -