घरमुंबईकाँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; प्रभाग समिती निवडणुकीत सेनेच्या बाजूने मतदान

काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; प्रभाग समिती निवडणुकीत सेनेच्या बाजूने मतदान

Subscribe

भाजपच्या ताब्यातून 'ए, बी, ई' समिती आणली सेनेने खेचून

मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणो विशेष समितीच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या काँग्रेस पक्षाने प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या झोळीत मतांचे दान टाकले. महापालिकेच्या ए, बी व ई प्रभाग समिती च्या निवडणुकीत काँग्रेसने खुलेआम शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांना मतदान केले . त्यामुळे भाजपचे उमेदवार ऍड मकरंद नार्वेकर यांना पराभव पत्करावा लागला. या विभागात काँग्रेसची चार तर समाजवादी पक्षाचे एक मत आहे. या मतांच्या जोरावर भाजप चमत्कार करण्याची स्वप्ने रंगवत होते. पण स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे काँग्रेसला तटस्थ न ठेवता त्यांची मते आपल्याकडे फिरवण्यात यशस्वी झाले आणि सेनेच्या हातात ही समिती प्रथमच आली आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना बुधवारपासून सुरुवात झाली. महापालिकेच्या जी/ दक्षिण, जी/ उत्तर आणि सी व डी या प्रभाग समितीत अध्यक्ष पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने अनुक्रमे शिवसेनेचे दत्ता नरवणकर, सेनेचे टी जगदीश आणि भाजपच्या मीनल पटेल यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे निवडणुकीची औपचारिक पूर्ण करून पिठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले.

- Advertisement -

तर त्यानंतर ए, बी व ई प्रभाग समितीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. या निवडणुकीत सेनेच्यावतीने रमाकांत रहाटे आणि भाजपच्या वतीने ऍड मकरंद नार्वेकर हे निवडणूक रिंगणात होते. आजवर तीन वर्षे ही प्रभाग समिती भाजपकडे होती. या प्रभागात सेनेचे ३, भाजप ३, काँग्रेस ४, अभासे १ आणि सपा १ असे संख्याबळ आहे. आजवर काँग्रेस व सपा तटस्थ राहत असल्याने अभासेच्या गीता गवळी आणि भाजपचे ऍड मकरंद नार्वेकर हे निवडून आले होते. परंतु यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सेनेचे रहाटे यांच्या बाजूने मतदान केले.

विशेष म्हणजे भाजपला पाठिंबा देणारे अभासेच्या गीता गवळी तटस्थ राहिल्या. त्यामुळे भाजपचे नार्वेकर यांना ३ तर रहाटे यांना ०८ मते मिळाली. त्यामुळे पिठासीन अधिकारी यांनी रहाटे यांना अध्यक्ष म्हणून घोषित केले. एच / पूर्व व एच/ पश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकीत सेनेच्या प्रज्ञा भूतकर विजयी झाल्या. ही प्रभाग समिती सेनेकडे असून ती त्यांनी कायम राखली आहे.


मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी ‘वॉटर ग्रीड’चा पर्याय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -