घरCORONA UPDATECoronaVirus: माहिम पोलीस वसाहतीतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण

CoronaVirus: माहिम पोलीस वसाहतीतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण

Subscribe

माहिम येथील नवीन पोलीस वसाहतीतील आणखी तीन पोलिसांचे कोरोनाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या पोलिसांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे. माहिम येथील नवीन पोलीस वसाहतीतील आणखी तीन पोलिसांचे कोरोनाचे चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. या माहिम पोलीस वसाहतील एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला असता या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

महापालिकेच्या दादर, माहिम, धारावी या जी-उत्तर विभागातील एकट्या माहिममध्ये रविवारी कोरोना पॉझिटिव्हचे चार रुग्ण आढळून आले. त्यामुळे माहिममधील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत युनिक हाईट्स (३ रुग्ण), ब्रीच कँडी क्वार्टर्स (३ रुग्ण), डायलिसीस रुग्ण (१ रुग्ण) प्रकाश नगर (१ रुग्ण), नवीन पोली0स वसाहत (५ रुग्ण)आढळून आले आहेत.

- Advertisement -

धारावीत आणखी २० रुग्णांची भर

महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावीमधील रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी आणखी २० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या १३८ वर पोहोचली आहे. यामध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्याने आढळून आलेल्या २० रुग्णांमध्ये ६० फुटी रस्ता (१ रुग्ण), धोरवाडा (१ रुग्ण), कल्याणवाडी (३ रुग्ण), बाबा मस्जिद (१ रुग्ण), शिवशक्ती नगर (१ रुग्ण), चमडा बाजार (१ रुग्ण), राजीव गांधी चाळ (१ रुग्ण), कुचिकुरवे नगर (१ रुग्ण), मुकुंद नगर (२ रुग्ण), नाईक नगर (१ रुग्ण), फातिमा चाळ (६ रुग्ण) आदींचा वस्तींचा समावेश आहे.

हेही वाचा –

Coronavirus: व्यक्तींवर होणारी जंतुनाशक फवारणी अपायकारक ठरु शकते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -