घरCORONA UPDATECorona: धक्कादायक! कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार

Corona: धक्कादायक! कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार

Subscribe

मुंबईतील वडाळा पूर्व येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातलगांना न कळवताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला न कळवता मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर घरातले संसर्ग होण्याच्या भीतीने मृतदेह घेण्यासाठीही येत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र या प्रकरणी कुटुंबियांना आपल्या नातलगाचे शेवटचे दर्शन घ्यायचे होते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, घडल्या प्रकरणी पोलीस, महापालिका आणि हॉस्पिटल प्रशासनापैकी कोणीही स्पष्टीकरण देण्यासाठी समोर आलेले नाही.

हेही वाचा – आता फुंकरमधून होणार कोरोनाची चाचणी, अवघ्या एका मिनिटांत मिळणार रिपोर्ट!

- Advertisement -

काय आहे प्रकरण

वडाळ्यातील बरकत अलीनगरमध्ये राहणारे कोरोना पॉझिटिव्ह ४१ वर्षीय राकेश वर्मा यांचा १७ मे रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र त्यांच्या कुटुंबियांना याबाबत कोणतीच माहिती दिली गेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. २१ मे रोजी क्वारंटाईनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे कुटुंबिय माटुंग्यातील पालिकेच्या आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलच्या फेऱ्या मारू लागले. राकेश यांच्या आईने सांगितले की, मला न्याय हवा आहे. मी कसा विश्वास ठेवू की माझा मुलगा जीवंत नाही. मला त्याचे अखेरचे दर्शनही झाले नाही. तर पत्नी सुभाशिनी वर्मा यांनी म्हटले की, मॅडम सांगत होत्या, तुमचे पती बरे आहेत. त्यांना ऑक्सिजन लावले आहे. पोलिसां गेल्यावर सांगण्यात आले की त्यांचे तर १७ तारखेला निधन झाले आहे. जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नावासमोर बेवारस अशी नोंद करण्यात आली होती. यासंबंधी वडाळा पोलिसात चौकशी करण्यास सांगितले गेले. पोलिसात तक्रार करायला गेलो तर ते तपासणी करून सांगतो, अशी माहिती या महिलांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -