घरमुंबईशहरातील तलाव बनले गुन्हेगारांचे अड्डे

शहरातील तलाव बनले गुन्हेगारांचे अड्डे

Subscribe

सुरक्षारक्षक करतात काय?

शिरवणे गावातील राजू सुतार या युवकाची तलावाच्या बाजूला असलेल्या जागेत हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने पुन्हा एकदा तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी व्यसनाधीन तरुणांनी तलावाच्या बाजूलाच असलेल्या मोकळ्या जागांना आपले अड्डे बनवले आहे.

महापालिकेने तलावांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र वारंवार आढळणारे मृतदेह, तलावात बुडून होणार्‍या मृत्यूच्या घटनांमुळे तलावांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या घटना घडत असताना हे सुरक्षारक्षक नेमके असतात तरी कुठे? असा प्रश्न आहे.

- Advertisement -

नवी मुंबई शहरात असलेल्या मूळ गावठाणांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलाव आहेत. हे तलाव शहराच्या सौंदर्यात भर टाकत असल्याने सर्वच तलावांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. आकर्षक घाट तर तलावाजवळील स्वागत कमानी, त्याचबरोबर गणेश विसर्जनासाठी पाणी दूषित होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेली इटालियन गॅबीयन वॉल, आकर्षक स्वागत कमानींसाठी जोधपुरी मार्बलचा केलेला वापर केला आहे. तसेच भोवतालचा परिसरही आकर्षक करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची येथे वर्दळ पाहायला मिळते. सध्य स्थितीत स्वच्छ भारत अभियान सुरू असल्याने शहरातील तलावाला पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहे.

तलावात पडून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालिकेने शहरातील सर्वच 24 तलावांवर 46 सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 व दुपारी 3 ते रात्री 10 या कालावधीत या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. परंतु, कामाच्या वेळेत हे सुरक्षारक्षक या ठिकाणी हजर असतात का? की फक्त हजेरीपुरतेच हजर राहतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या जुईनगर तलावातील घटनेप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील पाण्यातही एकाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकांची हजेरी घेण्याची मागणी होत आहे. शहरातील मैदानांबरोबरच तलाव परिसर रात्रीच्या वेळी गर्दुल्ले तसेच तळीरामांचे अड्डे बनले आहेत. नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच ते शिवीगाळ करत आहेत. जुईनगर येथील चिंचोली तलावालगत उद्यानात दारू पित बसलेल्या मित्रांत झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या तळीरामांना घालण्याची गरज आहे.

- Advertisement -

तलावांवर सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. दोन पाळीत ते काम करीत आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसतात. या सर्वांवर पालिकेचे नियंत्रण आहे. परंतु याची दक्षता घेतली जाईल.
– दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ एक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -