वडाळ्याच्या शाळेतील दोन मुलांचा कुत्र्याने घेतला चावा

वडाळ्याच्या एस आय डब्लू एस या शाळेतील दोन मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. या दोघांवर ही सध्या शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai
Dog Bite
एस आय डब्लू एस शाळेतील मुलांचा कुत्र्याने चावा घेतला

वडाळा येथील एस.आय.डब्लू.एस या शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कुत्र्याने चावा घेतला असल्याचे समोर आले आहे. मिथरा आणि देवांग हसमुख अशी या दोघांची नावे आहेत. शीव रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनाही शाळेतील कॅम्पसमध्ये कुत्र्याने चावा घेतला. सोमवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान या दोघांनाही शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर, या दोघांवर उपचार करुन अँटी रेबिजचे इंजेक्शन देण्यात आली आहेत.

मिथरा या मुलीच्या ओठाचा कुत्र्याने चावा घेतला आहे. तर, देवांग हसमुख या मुलाच्या हाताचा कुत्र्याने चावा घेतला आहे. या दोघांनाही ईएनटी आणि आर्थोपेडिक विभागात पाठवले आहे. याविषयी शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितलं की, “एस.आय.डब्लू.एस या शाळेतील दोन लहान मुलांना कुत्रा चावला आहे. यात एक ८ वर्षांची मुलगी आणि एक ७ वर्षांच्या लहान मुलाचा समावेश आहे. मुलीच्या ओठाला आणि मुलाच्या हाताला कुत्रा चावला असून शाळेतील कॅम्पसमध्येच कुत्र्याने चावा घेतला, असे सांगण्यात आले. दोघांनाही अॅंटी रेबिजचे इंजेक्शन देण्यात आले आहे.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here