घरमुंबईराज्यात 13 शहरात ई कॉमर्स पार्सल हब

राज्यात 13 शहरात ई कॉमर्स पार्सल हब

Subscribe

राज्यात येत्या दिवसांमध्ये ई-कॉमर्स पार्सल हबची निर्मिती एकूण 13 ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात मोठी क्षमता हाताळणारे ई-कॉमर्स पार्सल हब हे ऐरोली, नवी मुंबई याठिकाणी उभारण्यात येणार आहे. पार्सल नेटवर्क ऑप्टिमायजेशन प्रकल्पांतर्गत ही क्षमता राज्यातील विविध 13 शहरातील पोस्ट कार्यालयात उभारण्यात येईल. ग्राहकांकडून ई-कॉमर्स पार्सलची वाढती मागणी लक्षात घेऊन पोस्ट यंत्रणेमार्फत पार्सल पोहचवण्यासाठी

सध्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये ई-कॉमर्स पार्सल हबची यंत्रणा उभारण्यात आली आहे. येत्या दिवसांमध्ये अन्य ९ ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने ई-कॉमर्सचे ग्राहक उपलब्ध होणार्‍या ठिकाणी ही सुविधा देणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

या ई-कॉमर्स हबमुळे पोस्टाचा महसूल हा 20 टक्के ते 30 टक्के इतका वाढू शकतो, असे पोस्टाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सध्या अनेक पोस्टात बिझनेस तसेच एक्सप्रेस पार्सल हाताळण्याची क्षमता आहे. ई-कॉमर्सचे पार्सल हे त्याच यंत्रणेचा भाग आहे. मात्र त्यासाठी वेगळी ई-कॉमर्स पार्सल हब ही यंत्रणा उभारण्यात आली. ही यंत्रणा केवळ ई-कॉमर्सचे पार्सल तातडीने हाताळण्यासाठी उभारता येणार आहे.

काय आहे ई-कॉमर्स हब
ई-कॉमर्स पार्सल हबमध्ये संपुर्ण बारकोडवर आधारीत पार्सल स्कॅनिंगची यंत्रणा उभारण्यात येते. त्यात पार्सलला बारकोड लावणे ते स्कॅनिंग मशीनने स्कॅन करणे यांचा समावेश आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी कनव्हेयर बेल्ट उभारण्यात येणार आहे तसेच या ई-कॉमर्स पार्सल हबचे सॉर्टिंगही करण्यात येईल. त्यामुळे किमान कालावधीत हे पार्सल डिलिव्हरीसाठी जाण्यासाठी मदत होते. भारतीय पोस्टाच्या वेबसाईटवरून हे पार्सल ट्रॅक करण्याचीही सुविधा आहे. ई-कॉमर्स पार्सल हबची यंत्रणा उभारण्यासाठी सरासरी अडीच लाख रूपये इतका खर्च पोस्टाला येणार आहे.

- Advertisement -

औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जळगाव, नांदेड, नाशिक रोड, मालेगाव याठिकाणी पार्सल हब उभारण्यात येतील. गोवा विभागांतर्गत मडगाव, मिरज, रत्नागिरी, सातारा याठिकाणी, नागपूर विभागांतर्गत नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर तर पुणे विभागांतर्गत पुणे, अहमदनगर आणि सोलापूर याठिकाणी ई -कॉमर्स पार्सल हब उभारण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -