घरमुंबईतृतीयपंथीयांसाठी राज्यात लवकरच स्थापन होणार कल्याण मंडळ

तृतीयपंथीयांसाठी राज्यात लवकरच स्थापन होणार कल्याण मंडळ

Subscribe

साडेचार वर्ष रखडलेला तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. यानंतर लवकरच राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या कल्याण मंडळात तृतीयपथीयांच्या प्रश्नांवर लक्ष दिले जाणार आहे.

समलैंगिक संबधांना कायद्याची मान्याता मिळाल्यानंतर राज्यात सरकारने आता तृतीयपंथी संबधात महत्वाचा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथीयांंना विकासाच्या झोतात आणण्यासाठी राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळामुळे तृतीयपंथी नागरिकांना मानात जगण्याचा आणि प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याचे न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

समिती मंडळ

तृतीयपंथांच्या कल्याणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल. याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली

- Advertisement -

शेवटी निर्णय झाला

इतर नागरिकांप्रमाणे तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने २०१४ मध्ये कल्याण मंडणाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता परंतू पाठपुरावा करूनही महिला व बालविकास विभागाने अमंलबजावणी केल नसल्यामुळे तृतीयपंथी कल्याण मंडळ हा विषय रेंगाळला होता. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडे देण्यात आला होते आणि साडेचार वर्षांनंतर आता निर्णय झाला आहे.

शिष्यवृती देण्यात येणार आहे

तृतीयपंथी कल्याण मंडळातर्फे तृतीयपंथीयांना ओळखपत्रे वितरीत केली  जाणार आहेत. शिक्षण घेण्यास सहाय्य होईल. यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येणार आहे. पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत ४८ हजार तर ६० हजार रूपयांची शिष्यवृती देण्यात येणार आहे.

- Advertisement -

विविध योजना राबवणार

आरोग्याविषयक जागृती व उपचारांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. व्यसनमुक्तीचे कार्यक्रम ही राबवले जाणार आहेत. तसेच आवास योजना आणि शिक्षित तृतीयपंथीयांसाठी कौशल्या योजना त्यांच्यासाठी राबवण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -