घरमुंबईसखी मतदार केंद्रातील मतदारांना मतदानाचे आवाहन

सखी मतदार केंद्रातील मतदारांना मतदानाचे आवाहन

Subscribe

येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी मतदान केंद्र’ अशी १० सखी मतदान केंद्र महिलांच्या हाती सोपविण्यात येणार आहेत.

ठविधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा सज्ज झाला असून येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदानाच्या दिवशी १० विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याच बरोबर प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी मतदान केंद्र’ अशी १० सखी मतदान केंद्र महिलांच्या हाती सोपविण्यात येणार आहेत. यामुळे या मतदान केंद्रात सखींकडून १०० टक्के मतदानाची अपेक्षा आहे,” अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

या ठिकाणी आहेत सखी मतदार केंद्र

मुंबई शहर जिल्ह्यातील सखी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी, फुलांचे तोरण लावून, इतर मतदान केंद्रापेक्षा आकर्षक मतदान केंद्र असणार आहेत. या मतदान केंद्राचा संपूर्ण कार्यभार हा सर्व महिला अधिकारी, कर्मचारी पाहणार आहेत. मुंबई शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय सखी मतदान केंद्र धारावी – सखी मतदान केंद्र क्र. १११, सायन कोळीवाडा – केंद्र क्र.६१, वडाळा– केंद्र क्र. ५१, माहिम – केंद्र क्र. १५५, वरळी –केंद्र क्र.४७, शिवडी – केंद्र क्र. १८६, भायखळा– केंद्र क्र.२३८, मलबार हिल – केंद्र क्र. १३३, मुंबादेवी – केंद्र क्र. २, कुलाबा – केंद्र क्र. १३८ या प्रमाणे महिला अधिकारी व कर्मचारी यांचे व्यवस्थापन व नियोजन असलेले प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी मतदान केंद्र’ असणार आहे.

- Advertisement -

असं असेल सखी मतदान केंद्र

या सखी मतदान केंद्रावर १ – केंद्रप्रमुख, ३ किंवा ४ निवडणूक कर्मचारी, १ – पोलीस शिपाई अशा ५ ते ६ महिलांचा समावेश असणार आहे. याबरोबरच मुंबई शहर जिल्हा १० मतदारसंघात एकूण १७८ मतदान केंद्रावर वेब कास्टींग सुविधा तर ९१ मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जरवर) असणार असल्याचेही सांगितले.

सुरक्षित स्थळी मतदान केंद्र

सखी मतदान केंद्र स्थापन केल्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी मदत होईल. सखी मतदान केंद्रावर अधिकारी-कर्मचारी महिला असतील सखी मतदान केंद्र निवडताना केंद्रांची सुरक्षितता लक्षात घेवून संवेदनशील केंद्र टाळून पोलीस ठाण्या नजीकच्या केंद्राची तसेच ज्या मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत नियुक्त केलेल्या ११४७३ अधिकारी/कर्मचाऱ्यांपैकी ४५७८ महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

पाळणाघर व दिव्यांगांसाठी सुविधा

विधानसभेच्या सर्व मतदारसंघात महिला मतदारांच्या बाळासाठी पाळणाघराची सुविधा ठेवण्यात आली असून दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, शिडी व्हेईकल आदी सुविधा मतदान केंद्रामध्ये उपलब्ध असणार आहेत. १०६५ दिव्यांग मतदारांनी या सुविधेसाठी आपली नाव नोंदणी केली आहे, असेही मुकादम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -