घरमुंबईमुंबईत 'शेतकरी पारतंत्र्य दिवस' साजरा

मुंबईत ‘शेतकरी पारतंत्र्य दिवस’ साजरा

Subscribe

शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ३१- बी या घटनादुरुस्ती विरुद्ध किसानपुत्रांनी मुंबईत आज ‘शेतकरी पारतंत्र्य दिवस’ म्हणून साजरा केला आहे. १८ जून १९५१ रोजी पहिली घटनादुरुस्ती झाली होती. या घटनादुरुस्तीत नवीन कायदे लागू करण्यात आले, ज्या कायदांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही. यातील सगळेच कायदे हे शेतकऱ्यांच्या हिता विरोधी असल्या कारणास्तव आज शेतकरींनी मुंबईमध्ये किसानपुत्र आंदोलन केले.

शेतकरी विरोधी कायदयामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत – अमर हबीब
१८ जून १९५१ला झालेल्या घटनादुरुस्तीत अनुच्छेद ३१बी व परिशिष्ट ९ जन्माला आले. या ९व्या परिशिष्टात जे कायदे टाकले जातात त्यांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही, अशी अनुच्छेद ३१-बी मध्ये तरतूद करण्यात आली. या शेतकरी विरोधी कायदयामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी केला आहे.या शेतकरी कायदा अनुच्छेद ३१-बी मधील संविधान-विसंगत तरतुदींच्या विरुद्ध मकरंद डोईजड हे किसानपुत्र सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

- Advertisement -

शेतकरीविरोधी कायद्यांविरोधी आंदोलन
घटना दुरुस्ती परिशिष्ट-९ मध्ये आज घडीला २८४ कायदे आहेत. यांपैकी २५० कायदे शेतकऱ्यांशी थेट संबंधित आहेत. सिलिंग, आवश्यक वस्तू हे जीवघेणे कायदेही त्यात आहेत. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी किसानपुत्र आंदोलन करीत आहेत. १८ जून १९५१ रोजी झालेल्या घटनादुरुस्तीने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, त्याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पाडले जात असल्याचा आरोप याचिकाकर्ता मकरंद डोईजड यांनी केला आहे.

किसनपुत्र आंदोलनाने न्यायालयात सरकार विरोधात ‘हे’ प्रश्न उपस्थित केले आहेत:
– शेतकऱयांच्या आत्महत्येचे मूळ कारण काय?
– कोणते कायदे शेतकऱयांना गळफास ठरले आहेत?
– सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे स्वरूप काय आहे?
– शहरी भागात राहणारे किसानपुत्र शेतकऱयांच्या स्वातंत्र्यासाठी काय करू शकतात?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -