घरमुंबईतुमच्या हातातली डेअरी मिल्क बनावट असू शकते! FDAची कारवाई

तुमच्या हातातली डेअरी मिल्क बनावट असू शकते! FDAची कारवाई

Subscribe

लहान-मोठ्यांमध्ये सर्वात आवडतं कुठलं चॉकलेट असेल तर ते डेअरी मिल्क कॅडबरी. पण FDA अर्थात अन्न व औषध प्रशासनानं नुकताच मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातून बनावट असल्याच्या संशयावरून डेअरी मिल्क कॅडबरीचा लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे आपण बनावट डेअरी मिल्क तर खात नाही ना? याची तपासणी करून घ्या!

जेवणानंतर ‘कुछ मीठा हो जाये’ असं म्हणत आपण अनेकदा कॅडबरी खातो. पण या कॅडबरी प्रमाणित आहेत का? किंवा चॉकलेट्सच्या पाकिटावर योग्य ती माहिती आहे का? तसंच त्यावर व्हेजिटेरियनचा हिरवा लोगो आहे का? हे आपण कधीच तपासून पाहात नाही. पण आता यापुढे या सर्व‌ बाबी गांभीर्याने तपासून घेणं गरजेचं आहे. कारण, एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने मस्जिद बंदर पश्चिम परिसरातून जवळपास १७ लाख ३५ हजार ५६० रूपयांच्या ‘डेअरी मिल्क’ चॉकलेट्स बनावट असल्याच्या संशयावरून जप्त केल्या आहेत. त्यामुळे जर तुमच्या हातातही डेअरी मिल्कची कॅडबरी असेल किंवा तुम्ही अशी कॅडबरी नेहमी खात असाल, तर ती बनावट नाही ना? याची खात्री करून घ्या! नाहीतर तुमच्या आरोग्याला त्याचा धोका उद्भवू शकतो!

‘व्हेज’ असल्याचा हिरला लोगोच नाही!

जप्त केलेल्या चॉकलेट्सवर योग्य ती माहिती नसल्याने, शिवाय व्हेजिटेरियन असल्याचा हिरवा लोगो नसल्याने ही चॉकलेट्स बनावट असल्याचा संशय एफडीए प्रशासनाला आहे. याशिवाय, चॉकलेट विक्रेता ‘एफडीए’चा परवाना न घेताच ‘कॅडबरी’ चॉकलेट विकत असल्याचंही समोर आलं आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचं एफडीएचे सह आयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

विक्रेत्यांवर FDAची कारवाई

मंगळवारी म्हणजेच १० सप्टेंबरला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मस्जिद बंदरच्या बेसॉन हाऊस येथील ए. एच. एंटरप्रायझेस दुकानावर छापा टाकला. या छाप्यात ‘एफडीए’च्या पथकाने कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटची तपासणी केली. त्यात अन्न सुरक्षा कायद्यानुसार चॉकलेटच्या पाकिटावर आवश्यक ती माहिती छापली नव्हती. शिवाय, विना परवाना चॉकलेटची विक्री होत असल्याचं देखील निदर्शनास आलं. त्यानुसार १६५ ग्रॅमची १९ हजार २८४ कॅडबरींचा साठा ‘एफडीए’ने जप्त केला. ज्याची किंमत १७ लाख ३५ हजार ५६० रुपये इतकी आहे. या चॉकलेटचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर संबंधित विक्रेत्यासह जिथून त्याने हे चॉकलेट्स विकत घेतले त्यांच्या विरोधातही आता अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आढाव यांनी दिली आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सी. स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली आहे. शिवाय या चॉकलेट्सचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


तुम्हाला हे माहिती आहे का? – डार्क चॉकलेट खा आणि हेल्दी राहा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -