अग्निशमन दलातील जवानांना सलाम

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अधिकारी, जवानांना शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज येथे प्रदान करण्यात आले. शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पुरस्कार अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सलाम करण्यात आला.

Mumbai
fire on jhing jhing jhingat set at chembur
'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटवर आग

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अधिकारी, जवानांना शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज येथे प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभास नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या समारंभात अग्निशमन सेवा संचालनालय व सेवा अकादमीसाठी व राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमांच्या अनुषंगाने महाराष्ट्र अग्निशमन सेवा यासाठी निश्चित करण्यात आलेला ध्वज राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे आता राज्यभर संचालनालयाचा एकाच स्वरुपाचा ध्वज दिसणार आहे.

शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पुरस्कार

अग्निशमन सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींच्यावतीने दरवर्षी अग्निशमन सेवा शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवा पदक जाहीर केली जातात. त्यानुसार महाराष्ट्रातील अग्निशमन सेवा दलातील सातजणांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा शौर्य पदक जाहीर झाले होते. यातील पाचजणांना हे पदक मरणोत्तर जाहीर झाले होते. काळबादेवी परिसरातील गोकुळ निवास इमारतीच्या आगीत बचाव कार्य करताना मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख सुधिर अमीन, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे, अग्निशमन केंद्र अधिकारी महेंद्र देसाई हे शहीद झाले होते. तर अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क इमारतीच्या आगीत बचाव कार्यात नितीन येवलेकर शहीद झाले होते. या पाचजणांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा शौर्य पदक मरणोत्तर जाहीर झाले होते. या शहिदांच्यावतीने त्यांच्या वीर पत्नींनी पदक स्वीकारले. राज्य शासनानेही या वीरांना शहीद असा दर्जा दिलेला आहे.

समारंभात मुंबई अग्निशमन दलाचे सर्जेराव बंडगर यांच्यासह अमित पडवल, मनोजकुमार एरंडे, सूर्यकांत पाटील, माणिक ओगले, विश्वनाथ लोट, आर. फर्नांडीस,अमोल मुळीक, भूषण निंबाळकर तर नाशिक अग्निशमन दलाचे दिपक गायकवाड, देवीदास इंगळे, हेमंत बेळगावकर, शिवाजी खुलगे, शिवाजी फूगट, अविनाश सोनवणे, बाळासाहेब लहानगे यांनाही शौर्य पदक प्रदान करण्यात आली. तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मुंबई अग्निशमन दलाचे प्रभात रहांगदळे, राजेंद्र चौधरी यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी अनिल सावंत, आत्माराम यादव,वसंत पवार, रामपूजन सिंह यांनाही सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी डॉ. प्रभात रहांगदळे यांनी अहवालाचे वाचन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here