घरमुंबईइकबाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे पाच पोलीस निलंबीत

इकबाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे पाच पोलीस निलंबीत

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ही कारवाई केली असून यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. इकबाल कासकर एका खासगी गाडीतून बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई

या पाच जणांमध्ये उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार यांचा समावेश आहे. इकबाल कासकर सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून गुरुवारी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे पोलिसांनी त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची गंभीर दखल घेत कासकरला ठाणे कारागृहातून ते रुग्णालयापर्यंत नेणारे पोलीस कर्मचारी यासाठी जबाबदार असल्याचा निष्कर्ष त्यातून काढण्यात आला. त्यावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. चौकशीदरम्यान रोहिदास पवार आणि त्यांच्या टीमने कासकरला विशेष वागणूक दिल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -