घरCORONA UPDATEअपहरण झालेल्या 'त्या' चार मुलींची नवी मुंबई पोलिसांकडून सुटका

अपहरण झालेल्या ‘त्या’ चार मुलींची नवी मुंबई पोलिसांकडून सुटका

Subscribe

नवी मुंबई शहरातून अपहरण झालेल्या चार मुलींसह एका मुलाची नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दहा दिवसात सुटका केली आहे. या सर्व मुलींचे अपहरण तळोजा, खांदेश्वर, कोपरखैरणे आणि खारघर येथून झाले होते.

तळोजा येथून अपहरण करण्यात आलेल्या दहा वर्षीय मुलाची सुटका पोलिसांनी कर्नाटक राज्यातील उडपी येथे जाऊन केली. तळोजा परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. या मुलीची सुटका ही पोलिसांनी केली आहे. हे खांदेश्वर परिसरातून अपहरण केलेल्या मुलीला सातारा जिल्ह्यातील फलटण येथे नेण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेऊन या मुलीची सुटका केली आणि अपहरण करतो. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कोपरखैरणे आणि खारघर परिसरातील दोन मुलींची सुटका पोलिसांनी मानखुर्द आणि पुणे शहरातील वाघोली येथून केली आहे. ही कारवाई सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड आणि त्यांच्या पथकाने केली.

- Advertisement -

हेही वाचा –

रॅपिड ॲण्टी बॉडीज चाचण्यांचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -