घरमुंबईआणखी ४ पॅथॉलॉजिस्टवर होणार कारवाई ?

आणखी ४ पॅथॉलॉजिस्टवर होणार कारवाई ?

Subscribe

पॅथॉलॉजी लॅब डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रक्त, लघवी तपासणीसाठी गेल्यानंतर अनेकदा फक्त टेक्निशियनच भेटतात. किंवा टेक्निशियनच रक्ताची तपासणी करतात. त्यासोबत रिपोर्टही देतात. पण, असे करणे रुग्णांच्या जीवावर बेतते. अनधिकृत किंवा अधिकृत पॅथॉलॉजी लॅब्सना अधिकृत पॅथॉलॉजिस्ट स्वत:चे लेटरहेड, फॉर्म देऊन, तसेच सह्या करण्याची मुभा देतात.

पॅथॉलॉजी लॅब डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रक्त, लघवी तपासणीसाठी गेल्यानंतर अनेकदा फक्त टेक्निशियनच भेटतात. हे टेक्निशियनच रक्ताची तपासणी करतात आणि रिपोर्टही देतात. पण, असे करणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. अनधिकृत किंवा अधिकृत पॅथॉलॉजी लॅब्सना अधिकृत पॅथॉलॉजिस्ट स्वत:चे लेटरहेड, फॉर्म देऊन तसेच सह्या करण्याची मुभा देतात. मात्र स्वत: हा पॅथॉलॉजिस्ट लॅबमध्ये उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांना चुकीचे रिपोर्ट्सही दिले जातात. यातून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो.

या प्रकारांमुळे अशा पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांविरोधात ‘एमएमसी’ म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिलने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या रडारवर राज्यातील आणखी ४ पॅथॉलॉजिस्ट असल्याची माहिती ‘एमएमसी’ चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली आहे. गेल्या सहा महिन्यात २ पॅथॉलॉजिस्टवर कारवाई करण्यात आली असल्याचेही डॉ. उत्तुरे यांनी म्हटले आहे. आता पुन्हा एकदा पॅथॉलॉजिस्टवर एमएमसीने लक्ष केंद्रीत करत त्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम हाती घेतली आहे.

- Advertisement -

यापूर्वीच कायद्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. पण त्याचे पालन होत नसल्याने, तसेच आवश्यक जनजागृती नसल्याने बोगस पॅथोलॉजिस्ट्सचा धंदा तेजीत असल्याचे बोलले जात आहे. पंरतू, या स्पष्टीकरणानुसार बोगस पॅथोलॉजिस्ट्सविरोधात कारवाई झाली, एमसीआयकडे तक्रारी आल्या आणि एमसीआयने कारवाई केली तर नक्कीच अशा प्रकारांना आळा बसेल, असे मत पॅथॉलॉजिस्ट संघटनांनी व्यक्त केले आहे.

या कारणांमुळे होत आहे कारवाई
अशा प्रकारे चुकीची प्रॅक्टिस करणार्‍या चार पॅथॉलॉजिस्टच्या विरोधात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने परिषदेकडे तक्रार नोंदवली होती. या चौघांनी मिळून जवळपास १०० पॅथॉलॉजी लॅब्सना स्वत:चे लेटरहेड, नोंदणी क्रमांक आणि डिजिटल सह्या वापरण्यास दिल्या होत्या. या सर्व बोगस लॅब टेक्निशियन चालवत असल्याचेही स्पष्ट झाले होते. आजही हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार आता थांबवण्यासाठी एमएमसीने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात जवळपास १५ हजार पॅथॉलॉजी लॅब आहेत. त्यापैकी १ हजार ६०० मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात आहेत. त्यामुळे फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात ही असे प्रकार सुरू आहेत.

आतापर्यंत गेल्या ६ महिन्यात २ पॅथॉलॉजिस्टवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. शिक्षा ही महत्त्वाची आहे. पण, त्यासोबत जनजागृती करणेही गरजेेचे आहे. टेक्निशिअन हा फक्त टेक्निकल काम करु शकतो. तो रुग्णाचे रिपोर्ट तयार करु शकत नाही. मलेरियाच्या केसेसमध्ये ल्यूकेमिया असेल तर ते फक्त डॉक्टरच शोधून काढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी तिथे हजर असणे गरजेचे असते. कडक कारवाई करण्याबाबत सरकारसोबतही चर्चा झाली आहे. एक कमिटीही नेमण्यात आली आहे. या कमिटीत १८ मेंबर आहेत.
– डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिल

गेल्या ५ वर्षात एमएमसीने चांगल्या पद्धतीचे काम केले आहे. पण, पॅथॉलॉजिस्टनी सुद्धा स्वत: हा हजर न राहता काम करणे बंद केले पाहिजे. शेवटी हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्याचबरोबर फक्त पॅथॉलॉजिस्टच नाही तर बरेचसे डॉक्टर्स ही टेक्निशिअनला घेऊन स्वत: ची साईड लॅब चालवतात. अशाही तक्रारी एमएमसीकडे येत आहेत. त्यामुळे अशा लोकांसाठी एमएमसीने टेक्निशिअनच्या लॅबशी संलग्न होऊ नका अशा आशयाचे पत्र काढावे. जेणेकरुन रुग्णांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबू शकेल.
– डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट्स अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -