भिवंडीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा अत्याचार

अत्याचारी मित्रासह या प्रकरणी अल्पवयीन मुलीकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीच्या मित्राला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्या दोघांनाही २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Bhiwandi
Minor girl raped in bhiwandi

अल्पवयीन मुलीचे मित्राशी प्रेमसंबंध जुळल्याने या प्रेम संबंधाचा मित्राने गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची तर दुसऱ्या मित्राला हे प्रेम प्रकरण माहीत पडल्याने त्याने अल्पवयीन मुलीकडून ५ हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर आणखीन १७ हजार रुपयांच्या रकमेसाठी तो त्या अल्पवयीन मुलीकडे सतत तगादा लावत होता. याप्रकरणी दोघा मित्रांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा नराधमांना पोलिसांनी अटक करून त्यांना ठाणे जिल्हासत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई शहरातील २९ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

विवेक रणजीत यादव (२१) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा जौनपूर, उत्तरप्रदेश येथील राहणारा असून सध्या तो भिवंडीतील काटई येथील भाड्याच्या खोलीत राहत आहे. तर सुरज रामफेज विश्वकर्मा (१९) असे अल्पवयीन मुलीकडून खंडणी उकळणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा राहणारा प्रतापगड, उत्तरप्रदेश येथील असून सध्या काटई येथे भाड्याच्या खोलीत राहत आहे. या घटनेतील विवेक याचे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत विवेक याने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले.

आरोपीच्या मित्राची खंडणीची मागणी

ही बाब विवेकचा मित्र सूरजला माहीत पडल्याने त्याने अल्पवयीन मुलीकडून ५ हजार रुपयांची खंडणी घेतली. तिच्याकडून तो १७ हजार रुपयांची आणखीन मागणी करत होता. पैसे न दिल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी सूरज त्या मुलीला देत होता. अखेर भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी विवेक व सूरज या दोघांनाही अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय आर.जे.धोंडगा करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here