घरमुंबईठाणे जिल्हा जुगाराच्या विळख्यात

ठाणे जिल्हा जुगाराच्या विळख्यात

Subscribe

नऊ महिन्यांत 249 अड्ड्यांवर धाडी

ठाण्यातील गल्लीबोळात जुगाराचे अड्डे झाले आहेत. ठाणे पोलिसांनी मागील नऊ महिन्यांत तब्बल 249 ठिकाणी धाड टाकून जुगारांवर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या जुगारात मटका, सट्टा आणि ऑनलाईन सट्टा या जुगार प्रकारांचा समावेश आहे. मटका या सट्टाची जागा आता लॉटरी, क्रिकेट सट्टा, ऑनलाईन सट्टा आदी नव्या जुगाराच्या प्रकाराने घेतली आहे.

या नवीन जुगार प्रकाराचे संपूर्ण स्वरूप मटका सट्टा सारखेच असून या जुगार प्रकाराच्या जाळ्यात गोरगरीब तरुण फसले आहेत. तसेच ठाण्यात सुमारे 1 हजार 600 ऑनलाईन लॉटरीच्या दुकानांचे परवाने प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन जुगारही वाढला आहे.

- Advertisement -

एकीकडे मोजक्याच काही ऑनलाईन लॉटरींना शासनाची परवानगी असली तरी त्याच्या आडून जुगाराचे अनेक अवैध प्रकार सर्रास सुरू असल्याचे वेळोवेळी आढळून आले आहे. त्यामुळे अशा अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार जानेवारी ते सप्टेंबर 2019 या नऊ महिन्यांच्या कालावधीत ठाणे पोलिसांनी तब्बल 249 जुगार अड्ड्यांवर धाड टाकून कारवाई केली. तर मागील वर्षी म्हणजेच 2018 या वर्षात 260 जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली होती.

जुगार अड्ड्यांवर झालेली कारवाई (सप्टेंबर पर्यंत)
•2019 – 249
•2018 – 260
•2017 – 184
•2016 – 200
•2015 – 142
•2014 – 123

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -