घरमुंबईबाप्पा निघाले मुक्कामाला

बाप्पा निघाले मुक्कामाला

Subscribe

कोल्हापूरच्या राजाचे प्रस्थान

मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचे तयारीचे वेध लागले असून मुंबईत अनेक ठिकाणी पाद्यपूजन आणि पाटपूजनाचे सोहळे रंगू लागले आहेत. तर दुसरीकडे अनेक मंडळांनी आतापासूनच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन सोहळे आयोजित केले असून रविवारी मुंबईत पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा पार पडला आहे. प्रसिद्ध मुर्तिकार संतोष कांबळी यांच्या कारखान्यातून हा आगमन सोहळा रंगला. कोल्हापूरचा राजा अशी ख्याती असलेल्या गोल सर्कल मंडळ मंडळाने कोल्हापूरसाठी आपल्या बाप्पाचे मूर्ती मोठ्या जल्लोषात नेत मुंबईकरांचे लक्ष वेधले. तर त्याचबरोबर मुर्तिकार राहुल घोणे यांच्या कार्यशाळेतून देखील थेट सातासमुद्रा पार मॉरिशिस येथे गणरायाच्या मुर्ती प्रस्थान करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली असून या मंडळांनी आर्कषण आणि सुबक मूर्तींसाठी जवळपास सर्वच गणेशोत्सव मंडळाकडून मुंबईतील लालबाग येथील मुर्तीकारांकडे ओढा असतो. त्यापैकी अनेकांचा कल हा लालबागच्या राजाच्या मुर्तीकडे अधिक असतो. त्यानुसार कोल्हापूर येथील गोल सर्कल मंडळाने देखील मुंबईहून कोल्हापूर येथे गणरायाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी या मंडळाने मुर्तिकार संतोष कांबळे यांच्या कार्यशाळेतून कोल्हापूरच्या या मंडळाच्या मुर्तीचा प्रस्थान मार्ग सुरु झाला आहे. २९ जुलै रोजी ही मूर्ती कोल्हापुरात दाखल होणार आहे आणि मोठ्या थाटात कोल्हापूरच्या राजाचे आगमन सोहळा पार पडणार आहे. कोल्हापूर येथील रंकळेश स्टँडपासून हा संपूर्ण सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी या मंडळाच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

दोन मुर्ती निघाल्या मॉरिशसला

राज्याप्रमाणे परदेशात ही गणेशोत्सव साजरा करण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून वाढल्याचे पहायला मिळाला आहे. त्यामुळे तेथे देखील लालबाग परळ येथील मूर्तीकारांच्या कार्यशाळेतील मुर्तींना प्राधान्य दिले जाते. त्यानुसार मुर्तीकार राहुल घोणे यांच्या कार्यशाळेतील दोन मुर्तीचा प्रवास रविवारपासून सुरु झाला आहे. या दोन मूर्तीपैकी एक मुर्ती ८ फूटांची तर दुसरी मुर्ती ११ फूटांची असून आज नावाशेवा येथून बोटीने या गणेशमूर्त्या मॉरिशसला रवाना झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -