घरमुंबई'अाधी राज ठाकरेंशी बोला मग नोटीसा पाठवा'- राज ठाकरे

‘अाधी राज ठाकरेंशी बोला मग नोटीसा पाठवा’- राज ठाकरे

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेमध्ये मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न लावून धरला. शासकीय वसाहतीतून मराठी माणसाली कुणी हलवू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथे जाहीर सभा घेतली. यावेळी  परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी माणसांच्या घरावर गदा येत असल्याचा राज ठाकरेंनी आरोप केला. ”ज्यांनी सरकारची सेवा केली आणि जे आयुष्यभर या सरकारी वसाहतीमध्ये राहिलेत त्यांना आता सरकार घर खाली करण्यासाठी नोटिसा पाठवत आहे. मात्र तुम्ही घाबरू नका तुम्हाला बाहेर काढण्याची कुणीही हिंमत करू शकत नाही” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. याशिवाय राज यांनी सत्ताधारी पक्ष तसंच विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. बुलेट ट्रेन, वाढत चाललेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या, शासकीय मराठी माणसाच्या तसंच पोलिसांच्या घरांचे प्रश्न अशा अनेक समस्यांवर आपलं परखड मत मांडलं. एक नजर टाकूया राज ठाकरे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्द्यांवर-

  • आज तुमच्या सारखा पोलिसांच्या देखील घराचा प्रश्न उभा आहे. महाराष्ट्रातील बिल्डर लॉबी शहरातल्या अनधिकृत झोपड्या वसवत आहेत
  • वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये ‘त्यांच्या’ लोकांच्या वसाहती होता आहेत. तिथून मराठी माणूस नाहीसा होणार आहे
  • या भागातून बुलेट ट्रेन जाणार असल्यामुळे गुजराती लोकांचा वस्ती इथे झपाट्याने वाढणार आहे
  • वांद्रे मधल्या गव्हर्नर कॉलनीमध्ये राहून इथेच मराठी माणसासाठी घर बांधून दाखवणार. सरकारची हिंमत असेल तर त्यांनी तुम्हाला त्याने काढून दाखवावे

    - Advertisement -
  • तुम्ही जितकी वर्ष या सरकारी वसाहतीमध्ये घालवली यापुढे देखील तुम्ही इथेच राहणार

  • तुम्हाला सरकारची परत नोटीस आली तर सरकारला चार ओळींचे पत्र लिहा आणि या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी बोला असे सांगा

  • या लोकांचा डोळा अख्ख्या मुंबईवरती आहे. हे शहर मराठी माणसाला मिळू नये यासाठी हे कारस्थान आहे
  • मुंबई ही गुजरातला हवी होती. मात्र तेव्हा लढा देऊन आपल्या हुतात्मानी मुंबई मिळवली. त्यावेळची जखम भरून काढण्यासाठी यांना आता मुंबई हवी आहे
  • गुजरात सरकारने एक वेबसाईट काढली त्यामध्ये जे गुजराती देशाबाहेर राहतात त्यांच्यासाठी गुजरात स्टेट कार्ड काढलं आहे.  हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्याला त्याची सवलत मिळेल अशी माहिती त्यात आहे
  • राज ठाकरे जेव्हा मराठी माणसाबद्दल बोलतो तेव्हा मी देश तोडतो असा हे लोक आरोप लावतात
  • महाराष्ट्रामध्ये सध्या इंच इंच विकू अशी परिस्थिती आहे. हे लोक आज दिसेल ती जमीन की विकून टाकत आहेत
  • प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याच्या लोकांचा विचार केला जातो. मग आम्ही आमच्या राज्यातल्या लोकांबद्दल विचार केला की यांच्या अंगावर येतात. मात्र मी अशा अंगावर येणाऱ्या लोकांना भीक घालत नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -