घरमुंबईबालाजी मंजुळेंनी तुकाराम मुंढेंनाही मागे टाकले!

बालाजी मंजुळेंनी तुकाराम मुंढेंनाही मागे टाकले!

Subscribe

वडार समाजातील ते पहिले आयएएस,८ महिन्यांत ३ बदल्या,२०१९मध्ये मंजुळे आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले

कडक शिस्तीचे आणि राजकारण्यांना न जुमानणारे म्हणून ख्याती असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे याची १२ वर्षांत १३ वेळा बदली झाली. त्यांच्या कामगिरीपेक्षाही त्यांच्या बदल्यांचीच चर्चा होते. मात्र आता २००९ सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी बालाजी मंजुळे यांनी तर मुंढेंनाही मागे टाकले आहे. गेल्या ८ महिन्यांत त्यांची तीन वेळा बदली झाली आहे.

त्यामुळे एका पोस्टिंगवर सरासरी १ वर्ष काढणार्‍या तुकाराम मुंढेंपेक्षाही बालाजी मंजुळे यांचा कार्यकाल कमी म्हणजे अडीच ते तीन महिन्यांवर आला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी न पटल्यामुळेच मंजुळेंच्या बदली होत असल्याचं सांगितलं जात आहे. २००९साली बालाजी मंजुळे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाले होते. वडार समाजातले ते पहिले आयएएस आहेत. दगड फोडण्यासारखं कष्टाचं काम करणार्‍या आई-वडिलांच्या मुलाने प्रचंड जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेलं यश तेव्हा सर्वांच्याच कौतुकासाठी पात्र ठरलं होतं. त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी असून दुसर्‍या डोळ्याची दृष्टी देखील कमी आहे.

- Advertisement -

मात्र तरीदेखील त्यांनी हे यश मिळवलं. त्यानंतर त्यांना नोकरीसाठी आंध्र प्रदेश कॅडर देण्यात आले होते. तिथल्या नेत्यांना देखील मंजुळेंनी त्यांच्या कडक कारभाराचा इंगा दाखवल्यामुळे नेतेमंडळी त्यांच्यावर नाराज होती. प्रतिनियुक्तीवर २०१९मध्ये मंजुळे आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. त्यांना वर्षाच्या सुरुवातीला अपंग कल्याण आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला. पण अवघ्या पावणे दोन महिन्यांतच त्यांची बदली नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदी केली. खुद्द रावल यांनीच कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांना नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी आणावे अशी शिफारस मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.

पण फेब्रुवारीत नंदुरबारला आलेल्या मंजुळेंची पाचच महिन्यांत पुन्हा बदली करून त्यांना पुण्यातल्या आदिवासी प्रशिक्षण संस्थेत पाठवले. तिथूनही त्यांची दोनच महिन्यांत पुन्हा बदली होऊन त्यांना नियोजन विभागात उपसचिव पदावर रुजू होण्यास सांगण्यात आले. तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, नवी मुंबई पालिका आयुक्त आणि नाशिक पालिका आयुक्तपदी असताना अनेक लोकपयोगी धोरणात्मक निर्णय घेतले. सध्या मुंढे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेत प्रकल्प संचालक पदावर कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -