घरमुंबईमुंबईतील दुकाने रात्री ९.३० तर हॉटेल्स-बार ११.३० पर्यंत खुली; पालिकेची परवानगी

मुंबईतील दुकाने रात्री ९.३० तर हॉटेल्स-बार ११.३० पर्यंत खुली; पालिकेची परवानगी

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर अनलॉकला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेल्या दुकानांची वेळ अडीच तासांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे दुकानांसह व्यापारी आस्थापने ही रात्री साडे नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेले हॉटेल व फूड कोर्टसह रेस्टॉरंट व बार रात्री साडे अकरापर्यंत खुली ठेवण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

 

- Advertisement -

सध्या भाजी मार्केटसह दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी आहे. परंतु दुकाने व व्यापारी आस्थापने खुली ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. या मागणीचा विचार करत महापलिका आयुक्तांनी ही वेळ वाढवून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्यास परवानगी दिली आहे. तर ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांना एकूण क्षमतेच्या ३३ टक्के सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ते सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे.

हेही वाचा –

अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश न केल्याने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला मनसेचा दणका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -