घरमुंबईमुंबईतून दीड वर्षांत ८९४ मुले पळवली

मुंबईतून दीड वर्षांत ८९४ मुले पळवली

Subscribe

टोळ्यांचा धुमाकूळ, गर्दुल्ल्यांचा वापर, पोलिसांचे दुर्लक्ष

मुकुंद लांडगे

मुंबईत मुले पळवणाऱ्या टोळ्या कार्यरत असून गेल्या दीड वर्षांत मुंबई आणि परिसरातून सुमारे ८९४ मुलांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या टोळ्यांकडून अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचा मुले पळवण्यासाठी वापर केला जात आहे. या टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य कनेक्शनचा पोलीस आता तपास करत आहेत.
दादर रेल्वे स्थानकावरुन शुक्रवारी मध्यरात्री दोन वर्षांच्या बालिकेचे एका गर्दुल्ल्याने अपहरण केले. रेल्वे पोलिसांनी तीन तासात या चिमुकलीला पालकांच्या ताब्यातही दिले. मात्र मुंबई आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांमध्ये घडलेल्या अशा शेकडो प्रकरणातील बालकांचा शोध अद्याप लागलेला नाही.
२०१२ साली सागर राजू महत नावाच्या गर्दुल्ल्याने सीएसटी रेल्वे स्थानकातून एका 10 महिन्यांच्या मुलीला पळवले होते. त्या बालिकेला तो नेपाळमध्ये नेणार होता. पोलिसांनी त्याला हरिद्वारमध्ये अटक करुन त्याचे हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड केले होते.
दादरमधील अपहरण झालेल्या आणि रेल्वे पोलिसांनी छडा लावलेल्या या घटनेपूर्वी मुंबईत अशा अपहरणाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार गेल्यावर्षी २०१७ पासून आतापर्यंत मुंबई आणि आजूबाजूला असलेल्या बाहेरच्या रेल्वे स्थानक परिसरात अशा अपहरणाच्या ८९४ घटना घडल्या आहेत. त्यात १२ वर्षांवरील मुलांचाही समावेश आहे. त्यातील एक चतुर्थांश मुलांना पोलिसांनी अपहरणकर्त्यांपासून सोडवले आहे.

- Advertisement -
  • मार्च महिन्यात नालासोपारा रेल्वे स्थानकावरुन एका महिलेने पळवलेल्या अंजली सरोज नामक ५ वर्षीय मुलीचा मृतदेह गुजरातमधील नवसारी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांना आढळला होता.
  • सप्टेंबर २०१७ मध्येही वाशी रेल्वे स्थानकात रघू शिंदे नावाच्या ५ वर्षींय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याचाही मृतदेह पोलिसांना नंतर आढळला होता.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन

पळवलेल्या मुलांना बाहेरच्या राज्यात अथवा परदेशात विकण्यात येते असे पोलिसांचे म्हणणे आहे. चार महिन्यांपूर्वीही क्राईम ब्रँचच्या अधिकाèयांनी परदेशात पाठवण्यात येणाèया 12 मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यासोबत असलेल्या काही दलालांना अटक केली होती.

- Advertisement -

एकूण संख्या

  • ८९४ मुलांचे गेल्या दीड वर्षांत अपहरण
  • २०३ मुलांची अपहरणकर्त्यांकडून सुटका
  • १६ मुलांची अपहरणकर्त्यांकडून हत्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -