घरमुंबईकल्याण परिमंडळाची १०२ कोटीची वीज थकबाकी

कल्याण परिमंडळाची १०२ कोटीची वीज थकबाकी

Subscribe

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असून अनधिकृतपणे वीज घेणाऱ्या ग्राहकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाची चालू थकबाकी सुमारे १०२ कोटी ६६ लाखांवर पोहचली आहे. ऑगस्ट महिन्यात कल्याण परिमंडळातील दोन लाख ९८ हजार ५०० घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही चालू थकबाकी आहे. त्यामुळे थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिले आहेत. यादरम्यान वीज पुरवठा खंडीत झालेल्या ग्राहकाने जर अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास त्याला फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडळातील कल्याण-१, कल्याण-२, वसई व पालघर या चार मंडळ कार्यालयाअंतर्गत सुमारे २३ लाख ३० हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. यातील अनेक ग्राहक नियमित वीज बिल भरणा करत नाहीत. अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळलेल्या अद्यावत यादीनुसार ही करवाई होणार आहे. ”थकाबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकाने अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास त्यांच्यावर वीज कायदा-२००५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी चालू थकबाकी वेळेत भरून सहकार्य करावे,” असे आवाहन शेख यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ईडी, सीबीआयच्या माध्यमातून वैचारिक शत्रूंना उद्ध्वस्त करण्याचा डाव’

पुनर्जोडणी शुल्क भरणा अत्यावश्यक

थकबाकीमुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर सिंगल फेज ग्राहकांना १००रु. थ्री फेज ग्राहकांना २००रु., उच्चदाब ग्राहकांना ५०० रु. व १८ टक्के जीएसटी हे पुनर्जोडणी शुल्क म्हणून भरणे आवश्यक असते. पण बऱ्याच वेळा या नियमाचे पालन होताना दिसत नाही. यामुळे महावितरणचा महसूल बुडतो. त्यामुळे वीज बिल थकीत ग्राहकांनी थकीत बिल व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीज जोडू देऊ नये असे आदेश ही देण्यात आले आहेत. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

किती आहे थकबाकी?

कल्याण परिमंडळा अंतर्गत कल्याण-१ मंडळातील ५५ हजार ७०० ग्राहकांकडे सुमारे १४ कोटी १६ लाखांची थकबाकी आहे. कल्याण-२ मंडळातील ८२ हजार ५०० ग्राहकांकडे सुमारे २९ कोटी ८६ लाख इतकी तर पालघर मंडळातील ३९ हजार ९०० ग्राहकांकडे सुमारे १२ कोटी २५ लाख एवढी थकबाकी आहे. तर वसई मंडळ कार्यलयांतर्गत सर्वात जास्त म्हणजे एक लाख २० हजार ग्राहकांकडे सुमारे ४६ कोटी ३७ लाख इतकी चालू थकबाकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -