घरमुंबईभिवंडीत कपिल पाटील यांना सेनेचा विरोध कायम ?

भिवंडीत कपिल पाटील यांना सेनेचा विरोध कायम ?

Subscribe

भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे ग्रामीणचे शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे भिवंडीतील युतीच्या मेळाव्याला गैरहजर राहून त्यांनी आपला भाजपच्या उमेदवाराला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.

भिवंडीतील तीन विधानसभेतील युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपल्यानंतर पत्रकारांनी शिवसेनेचे स्टार प्रचारक आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सेनेचे ग्रामीण संपर्क प्रमुख बाळ्यामामा भाजपवर करीत असलेल्या कुरघोडीवर प्रश्न विचारला असता, पालकमंत्री शिंदे यांनी अधिक भाष्य न करताच उलट पत्रकारांनाच ‘अरे बाबा बाळ्यामामाने केल तरी काय’ ? असा प्रती प्रश्न विचारात काढता पाय घेतला आहे.

भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत ठाणे ग्रामीणचे शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा हे भिवंडीतील युतीच्या मेळाव्याला गैरहजर राहून त्यांनी आपला भाजपच्या उमेदवाराला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. यामुळे भाजप उमेदवार खासदार कपिल पाटील यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. त्यातच शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा साडेचार वर्षानंतर जिल्ह्यात लोकसभेसाठी युती झाली. गेल्या साडेचार वर्षात भाजपने आपल्याच ताब्यात जिल्ह्याची सत्ता राहावी म्हणून वेगळी चूल मांडत ग्रामपंचायत ते विधानसभा एकट्याच्या बळावर लढल्या. मात्र शिवसेनेनेही भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दडवता. कॉग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आणि इतर पक्षाची हातमिळवणी करून भिवंडी माहापालिका, जिल्हा परिषद, काही पंचायत समित्यावर सेनेची सत्ता मिळवली.

- Advertisement -

एकंदरीत गेल्या साडेचार वर्षात युतीच्या कार्यकत्यांमध्ये दरी निर्माण होवून कट्टर शिवसैनिकांनी भाजपच्या कपिल पाटील यांचे काम न करण्याचा निर्णय घेतला. तर काही शिवसैनिकांनी युतीचा धर्म जपण्यासाठी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे साडेचार वर्षानंतर धनुष्यबाण सोडून आता कमळाला मतदान करा असे शिवसैनिक बोलत आहे. मात्र युती बद्दल असलेल्या मतदार राजाच्या मनातील भावना मतपेटीतून बाहेर पडणार असल्याचे चित्र सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -