घरमुंबईअमिताभ बच्चन यांनी विचारला PUBGचा फुल फॉर्म!

अमिताभ बच्चन यांनी विचारला PUBGचा फुल फॉर्म!

Subscribe

पबजी गेमचा फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारल्यानंतर समोरच्या स्पर्धकानं दिलेलं उत्तर व्हायरल होऊ लागलं आहे.

हल्ली सगळीकडे जर कोणत्या व्हडिओ गेमची सर्वाधिक चर्चा असेल, तर ती आहे PUBG या गेमची! तरुणांमध्ये या गेमची तर सर्वाधित क्रेझ आहे. मात्र, आता या गेमबद्दल खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही प्रश्न पडला आहे. आणि हा प्रश्न अगदीच बेसिक आहे. विशेष म्हणजे ज्यांना अमिताभ बच्चन यांनी हा प्रश्न विचारला होता, त्यांना देखील या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! आता तुम्ही म्हणाल की असा कोणता प्रश्न आहे, जो अमिताभ बच्चन यांना पडला? आणि असं कोण आहे, ज्यांना PUBG बद्दलच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. तर तो प्रश्न होता ‘PUBGचा फुल फॉर्म काय आहे?’ आणि प्रश्न विचारला ती व्यक्ती होती विवेक भगत.


हेही वाचा – पतीचा पबजीला विरोध; पत्नीने थेट घटस्फोटच मागितला

काय होता बच्चन यांचा प्रश्न?

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं नवीन पर्व नुकतंच सुरू झालं आहे. त्याच्या दुसऱ्याच भागामध्ये अमिताभ बच्चन यांनी स्पर्धत विवेक भगत यांना पबजीबद्दल प्रश्न विचारला होता. ‘PUBGचा फुल फॉर्म काय आहे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. हा स्पर्धेतला प्रश्न असल्यामुळे त्यासाठी बच्चन यांनी ४ पर्याय देखील दिले होते. विवेक भगत यांना त्याचं बरोबर उत्तर माहीत नसल्यामुळे त्यांनी लाईफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. ऑडियन्स पोलचा पर्याय निवडला. त्या वेळी स्टुडिओमध्ये बसलेल्या प्रेक्षकांपैकी बहुतेकांनी पबजीचा फुल फॉर्म ‘प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड्स’ असा असल्याचं सांगितलं. यावेळी विवेक भगत यांनी ऑडियन्स पोलचा निर्णय मान्य केला आणि ते उत्तर बरोबर ठरलं!

- Advertisement -

भगत यांनी या एपिसोडमध्ये फक्त १० हजार रुपये जिंकले. मात्र, त्यामुळे PUBG चा फुल फॉर्म मात्र चांगलाच व्हायरल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -