घरमुंबईजम्मू काश्मीर नक्षल्यांच्या हिंसक कारवायांबाबत माधव भांडारींनी विचारला जाब

जम्मू काश्मीर नक्षल्यांच्या हिंसक कारवायांबाबत माधव भांडारींनी विचारला जाब

Subscribe

जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी हल्ला आणि छत्तीसगडमधील नक्षली हल्ला यांच्याबाबत काँग्रेस, त्याचे राष्ट्रवादी काँग्रेससारखे मित्रपक्ष आणि एरवी असहिष्णुता, लोकशाही, घटनात्मक संस्था याविषयी गळे काढणारे विचारवंतही गप्प.

सत्तेवर आल्यास देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करू असे जाहीर आश्वासन काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात दिले. त्यानंतर, त्या पक्षाने उघडपणे फुटीरतावाद्यांचे समर्थन केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये संघ स्वयंसेवकाची दहशतवाद्यांकडून हत्या आणि छत्तीसगडमध्ये भाजपाच्या आमदाराची हत्या अशा घटना घडल्या आहेत. काँग्रेस पक्ष आणि त्याच्या साथीदारांनी तसेच लोकशाहीसाठी गळा काढणाऱ्या विचारवंतांनी या घटनांचा ठामपणे निषेधसुद्धा केलेला नाही. या घटनाक्रमाचा अर्थ काय, असा प्रश्न भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी विचारला.

यावेळी, जम्मू काश्मीरचा स्वतंत्र पंतप्रधान असायला हवा, अशी भूमिका घेणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सला काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व महागठबंधनमधील इतर पक्षांनी साथ दिली आहे. सत्तेत आल्यास देशद्रोहाच्या विरोधातील गुन्ह्याचे कलम काढून टाकण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले. तसेच, काश्मीरमधील दहशतवादी आणि देशभर विविध ठिकाणी हिंसक कारवाया करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोईची भूमिकाही घेतली आहे. काश्मीरी फुटीरतावाद्यांशी चर्चा करू, देशाचे तुकडे होतील म्हणणाऱ्यांना मोकळीक मिळण्यासाठी संबंधित कायदा रद्द करू अशीही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे देखील भंडारी म्हणाले.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी हल्ला आणि छत्तीसगडमधील नक्षली हल्ला यांच्याबाबत काँग्रेस, त्याचे राष्ट्रवादी काँग्रेससारखे मित्रपक्ष आणि एरवी असहिष्णुता, लोकशाही, घटनात्मक संस्था याविषयी गळे काढणारे विचारवंतही गप्प आहेत, याचा जनतेने काय अर्थ लावायचा ?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीतील मित्र पक्ष तसेच एरवी छोट्या छोट्या विषयावर आरडाओरडा करणारे विचारवंत दहशतवाद आणि नक्षलवादाच्या विरोधात स्पष्ट बोलत नाहीत. तसेच, इतक्या मोठ्या घटना घडूनही गप्प आहेत याचा विचार देशातील सुजाण जनता नक्कीच करेल, असे देखील त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -