घरमुंबईपुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा, विखेंचा समावेश होणार?

पुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा, विखेंचा समावेश होणार?

Subscribe

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली असून त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची आणि मंत्रीमंडळ समावेशाची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या फेरबदलाची चर्चा आता पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये रंगू लागली आहे. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ फेर बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरापासून मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशा बातम्या माध्यमांतून समोर येत होत्या. मात्र आता निवडणूक सपल्यानंतर पुन्हा एकदा विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काही नवे बदल मंत्रिमंडळात होण्याची चिन्हे आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात काही आयारामांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विखेंना हवं महसूल मंत्रिपद!

पुत्र सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये कधी प्रवेश करतील? अशी चर्चा रंगलेली असताना आता विखे पाटील यांची देखील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागू शकते अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या प्रवेशानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्यांना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेले कृषीमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. मात्र विखे पाटील यांना कृषी खात्यापेक्षा महसूल खात्यात रस असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा देखील भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. तसेच या नेत्यांना देखील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’!

२३ मे नंतर होणार चित्र स्पष्ट

मंत्रिमंडळ विस्तार हा २३ मे रोजीच्या निकालावर अवलंबून असून, जर निकाल भाजपाच्या बाजूने लागला तर राज्यात विधानसभेच्या दृष्टीने पावले टाकली जाणार असून, यावर सगळी गणिते अवलंबून आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तराची चर्चा जोरात सुरू असल्याबाबत भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांना विचारले असताना त्यांनी देखील याबद्दल अधिक बोलणे टाळत ‘आधी लोकसभेचे निकाल बघू त्यानंतर पुढचे बघू’, अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -