घरमुंबईलवकर खर्च करा अन्यथा खासदार निधी परत जाईल

लवकर खर्च करा अन्यथा खासदार निधी परत जाईल

Subscribe

आचारसंहितेची नगरसेवकांना धास्ती

लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्या संबंधीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे खासदारांचा निधी वापरावा, अन्यथा तो वाया जाईल. अशी विनंती करूनही स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी हा विषय नवी मुंबई महापालिकेच्या पटलावर न घेतल्याने या सभेत शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी काही वेळ सभेचे कामकाज रोखून धरले. तर या विषयाचे गांभीर्य नसेल तर पूर्ण सभा उधळून लावू असा इशारा यावेळी शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिला.

कोपरखैरणे येथे दफन भूमीची मागणी असल्याने त्याची दखल घेत खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या निधीतून या दफन भूमीची दखल घेतली. यासाठी त्यांनी 15 दिवसांपूर्वी आपला खासदार निधी दिला. मात्र त्या निधीची तरतूद मनपाकडून करण्यात न आल्याने त्याची लवकरात लवकर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत कोपरखैरणे सेक्टर 19 मधील स्मशानभूमीत धूर प्रदूषण नियंत्रण यंत्रणेकरता नवीन एलटी वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव आला असता त्याला लागूनच असलेला विषय पटलावर घेण्याची मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली. दोन्ही विषय जनहिताचे असून तत्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीची दखल न घेत सदरील विषय पुढच्या सभेत घेऊ असा पवित्रा कुलकर्णी यांनी घेतला असता सेना नगरसेवकांनी सभापतींना धारेवर धरले आणि काही वेळ सभा रोखून धरली.

- Advertisement -

खासदार निधी येऊन 15 दिवस झाले आहेत. जनतेच्या मागणीनुसार हा निधी खासदारांनी दिला असून तात्काळ त्यावर कार्यवाही होण्याची गरज आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. त्यामुळे हा निधी वापरात घेणे गरजेचे आहे, अन्यथा तो परत जाईल.                                                                                          द्वारकानाथ भोईर, शिवसेना गटनेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -