घरमुंबईबाप्पा सांगतोय 'पब जी' गेमचे दुष्परिणाम

बाप्पा सांगतोय ‘पब जी’ गेमचे दुष्परिणाम

Subscribe

मालाडच्या शाम निर्मल सोसायटीचा 'पब जी' बाप्पा

पॉकेमॉन गो आणि ब्लू व्हेल या दोन गेम्सनंतर आता तरुणांमध्ये वेड आहे ते म्हणजे पब जी गेमचं. हल्ली मुलं तासंतास पब जी गेम खेळताना दिसत आहेत. एका वेळेस १०० जण या पब जी गेम्समध्ये गुंततात. वेळेची मर्यादा नसल्यामुळे तरुण खेळताना दिसतात. गेममधील वाढत्या स्टेजेससोबत तरुणांचा वेळ ही कसा जातो ते त्यांना कळत नाही. पण, सतत मोबाईलवरील इंटरनेटचा लहान मुलं आणि तरुणांवर वाढता प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. याच दुष्परिणामांवर भाष्य करणारा बाप्पा मुंबईतील मालाड परिसरात साकारण्यात आला आहे.

- Advertisement -

मालाड पश्चिम येथील शाम निर्मल सोसायटीने यावर्षी पब्जी गेम पासून होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी पब्जी बाप्पा साकारला आहे. पब्जी गेममधील वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि त्यातील कार, फायर गन्स, लेवल ३ हेल्मेट, बॉम्ब या गोष्टीचे स्टिकर ७ फूट उंचीच्या गणेशमूर्तीवर लावण्यात आले आहेत.


हेही वाचा – लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं

या मंडळातील मुलांनी जवळपास ५ दिवस आणि ५ रात्र मेहनत घेऊन ही मूर्ती साकारली आहे. या पब्जी बाप्पाच्या माध्यमातून पब्जी गेममुळे होणारे दुष्परिणामाची जनजागृती या मुलांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून ही मुर्ती साकारण्यात मुलांना यश आलं आहे. यंदा या मंडळाचं २२ वर्ष असून गेली अनेक वर्ष हे मंडळ समाजप्रबोधनपर काम करत आहेत. पब जी सारख्या सतत एकाच ठिकाणी बसून खेळल्या जाणाऱ्या खेळामुळे मुलं मैदानी खेळ विसरुन गेले आहेत. ज्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -