घरमुंबईभविष्यातील मुंबईबद्दलचा विचार प्रकट करणारी चित्रे - विश्वनाथ महाडेश्वर

भविष्यातील मुंबईबद्दलचा विचार प्रकट करणारी चित्रे – विश्वनाथ महाडेश्वर

Subscribe

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महान व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून अचूक भाष्य करण्याची त्यांची हातोटी वाखाणली गेली. त्यांच्या कलेपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन, उत्तम चित्रकार, व्यंगचित्रकार तयार व्हावे, हा ‘माझी मुंबई’ बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्राचे अवलोकन केले असता, मुलांच्या मनात आपल्या भविष्यकाळातील मुंबई शहराविषयी काय विचार आहेत? हे त्यांच्या चित्रातून प्रकट होत असून, हे ओळखण्यासाठी ही स्पर्धा दिशादर्शक माध्यम ठरते आहे, असे उद्गगार मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काढले.

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगरातील सर्व महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत आणि महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा २०१८-१९ चे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते महापौर निवासस्थानी रविवारी सकाळी करण्यात आले, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

- Advertisement -
बेस्ट संपाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे – एकत्रित बसून चर्चा केल्यास मार्ग निघेल

शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून ५७ हजार ३४४ बालचित्रकारांनी सहभाग घेतला. मुंबईतील महापालिकेची उद्याने – मैदाने बालचित्रकारांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या सुरेख चित्रांनी जणू फुलून गेली. सकाळी ८ ते ११ या वेळेदरम्यान आयोजित या स्पर्धेकरीता मुंबई शहर आणि उपनगरांतील विभागनिहाय एकूण ४२ उद्याने आणि मैदाने निश्चित करण्यात आली होती. विद्यार्थी आणि पालकांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने नागरिकांना मुंबई महानगराविषयी असलेल्या जिव्हाळ्याची आणि प्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती आली.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे, त्यासोबतच मुंबईविषयी त्यांच्या मनात दडलेली ‘चित्रे’ कागदावर चितारली जातील, याचा सर्वंकष विचार करुन गटनिहाय विषय निश्चित करण्यात आले होते. एकूण चार गटात ही स्पर्धा संपन्न झाली. इयत्ता १ ली ते २ री या प्रथम गटासाठी माझी मुंबई, मी आणि माझे कुटूंब, माझे आवडते खेळणे हे विषय देण्यात आले होते.

द्वितीय गट इयत्ता ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील जत्रा, आम्ही गणपती बनवतो, मुंबईच्या मेट्रोची सफर हे तीन विषय होते. तृतीय गट इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील पेंग्निवनची भेट, माझ्या स्वप्नातील मुंबई, कचरामुक्त मुंबई हे तीन विषय होते. इयत्ता ९ वी व १० या चतुर्थ गटासाठी मुंबईचे डबेवाले, माझी सुरक्षित मुंबई, माझी प्लॉस्टिकमुक्ती मुंबई हे ३ विषय देण्यात आले होते. चित्र रेखाटण्यासाठी स्पर्धकांना महापालिकेच्या कला अकादमीतर्फे कागद पुरविण्यात आला.

- Advertisement -

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सकाळी सर्वप्रथम महापौर निवासस्थानी प्रशस्त हिरवळीवर असलेल्या चित्रकला स्पर्धा केंद्रास भेट देवून बालचित्रकारांचे कौतुक केले. बाल स्पर्धकांकडून कागदावर उतरत असलेल्या चित्रांचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी निरीक्षण केले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्ह‍णाले की, या स्पर्धेतील स्पर्धकांनी साकारलेल्या चित्रातून मुंबईच्या विविध छटा बघायला मिळाल्या. बालचित्रकारांना त्यांचे सुप्तगुण चित्रांच्या माध्य‍मातून रेखाटण्यास वाव मिळत असल्याने विद्यार्थ्यांना एक वेगळया प्रकारचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेच्या माध्य‍मातून प्रदुषणमुक्त, कचरामुक्त मुंबईबद्दल त्या च्या मनात असलेले विचार, मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनविताना या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पना, अपेक्षा यांचाही त्यात सिंहाचा वाटा असेल, असा आशावादही महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासस्थान, माटुंगा येथील पाच उद्यान तसेच वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे भेट देवून बालचित्रकारांच्या चित्रांची पाहणी करीत त्यांचे कौतूक केले. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका रोहिणी कांबळे, नगरसेवि‍का प्रज्ञा भुतकर, नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर, माजी नगरसेवक अनिल त्र्यंबककर, शिक्षणाधिकारी महेश पालकर तसेच सर्व उप शिक्षणाधिकारी उपस्थित होते.शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक स्पर्धा प्रमुख दिनकर पवार आणि इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी बालचित्रकला स्पर्धा २०१८-२०१९ चे संयोजन केले.

ही स्पर्धा मागील ९ वर्षांपासून आयोजित करण्यात येते. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम (रुपये २५ हजार), द्वितीय (रुपये २० हजार) व तृतीय विजेते (रुपये १५ हजार) आणि १० उत्तेजनार्थ प्रती गट (रुपये ५ हजार प्रत्येकी) याप्रमाणे चारही गटांतून मिळून एकूण ५२ विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. त्याासोबतच विभागस्तगरावर प्रत्ये क गटात ५ याप्रमाणे चार गटात वीस याप्रमाणे एकूण २५ विभागांमध्ये पाचशे उत्तम चित्रांना प्रत्ये‍की पाचशे रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांची पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहे. पारितोषिकांची एकूण रक्कम रुपये ६ लाख ९० हजार इतकी आहे. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करुन समारंभपूर्वक या विजेत्यांना गौरविण्यात येईल.


 

हे वाचा – नयनतारा सहगल प्रकरणावरून गडकरींचा सरकारला घरचा आहेर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -