घरमुंबईइंटर्नशिपसाठी देण्यात आला साडेपाच लाख रुपयांचा पगार

इंटर्नशिपसाठी देण्यात आला साडेपाच लाख रुपयांचा पगार

Subscribe

बजाज महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला दोन महिन्याच्या इंटर्नशिपसाठी देण्यात आला तब्बल साडेपाच लाख रुपयाचा बक्कळ पगार.

जमनलाल बजाज इन्स्टिट्यूटमधील व्यवस्थापनाच्या एका विद्यार्थ्याला दोन महिन्याच्या इंटर्नशिपसाठी तब्बल साडेपाच लाख रुपयाचा बक्कळ पगार देण्यात आला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी स्टायपेंड देण्यात आली आहे. तसेच हा विद्यार्थी व्यवस्थापनाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.

स्टायपेंडमध्ये १८ टक्क्यांनी वाढ

भारतातील मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी देण्यात येणाऱ्या स्टायपेंड्समध्ये गेल्या काही वर्षांत भरघोस पगार वाढ करण्यात आली आहे. तर आयआयएम्समध्ये इंटर्नशिपसाठी तीन लाखाहून अधिक स्टायपेंड दिली जाते. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांना १ लाखाहून अधिक स्टायपेंड मिळते आहे. मात्र जमनलाल बजाज इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्याला मिळालेली स्टायपेंड सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्टायपेंडमध्ये १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर हा दोन महिन्याच्या इंटर्नशिपचा पगार एका आंतरराष्ट्रीय बँकेने दिला असून येत्या काळात व्यवस्थापन क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या – 

वाचा – डिलिव्हरी बॉईजची चांदी, मिळणार ५० हजार पगार

वाचा – आता वाढीव प्रसूती रजेचा अर्धा पगार देणार सरकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -