घरमुंबईमनसेचा फेरीवाल्यांविरोधात जी उत्तर कार्यालयावर मोर्चा

मनसेचा फेरीवाल्यांविरोधात जी उत्तर कार्यालयावर मोर्चा

Subscribe

मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलनं आणि अनेक मोर्चे काढले. पण, आता मनसेच्या राजगड या कार्यालयाबाहेरच फेरीवाल्यांना बसण्याची जागा पालिका देणार आहे. या विरोधात मनसेने मोर्चा काढत पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलनं आणि अनेक मोर्चे काढले. पण, आता मनसेच्या राजगड या कार्यालयाबाहेरच फेरीवाल्यांना बसण्याची जागा पालिका देणार आहे. या विरोधात मनसेने मोर्चा काढत पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पालिकेने निवासी क्षेत्रात राबवलेल्या फेरीवाले धोरण अंमलबजावणी विरोधात रहिवासी सुद्धा ही आहेत. रहिवासी आणि मनसेने एकत्र येत रस्त्यावर उतरून पालिकेच्या या हम करो सो कायद्याला जोरदार विरोध दर्शवला. मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राजगड या मनसेच्या कार्यालय येथून जी- उत्तर कार्यालयात बेधडक मोर्चा काढला.

यावेळी स्थानिक रहिवाशी कष्टकरी फेरीवाले या मोर्चात सहभागी होऊन निवासी क्षेत्रातील फेरीवाला धोरण अंमलबजावणी रद्द करा अशी घोषणाबाजी करत याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. फेरीवाला धोरण अंमलबजावणी रद्द करण्याबाबत सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून या धोरणाबाबत वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय देण्यात येईल. तसेच, २४ तारखेपर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार नाही असे आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिले असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. सर्वप्रथम फेरीवाला अंमलबजावणी धोरण रद्द करून लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, रहिवाशी आणि अधिकृत फेरीवाले यांची संयुक्त बैठक घ्यावी. अधिकृत व अनधिकृत फेरीवाले यांची आकडेवारी जाहीर करावी. तसेच, निवासी क्षेत्र, शाळा, रुग्णालय वगळता फेरीवाले क्षेत्र कुठे असावे याची नियमावली बनवून नैसर्गिक बाजारपेठांच्या ठिकाणी फेरीवाल्यांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने शहरात फेरीवाला धोरण राबवताना ठिकठिकाणी निवासी क्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यासाठी १X१ आकाराचे पट्टे आखले आहेत. यावर स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी झाल्यास त्यामुळे निवासी परिसर बकाल होईल तसेच स्थानिक रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागेल. शिवाय रहिवासी आणि फेरीवाले यांच्यात संघर्ष होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे मनसे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

फेरीवाला धोरण अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकृत फेरीवाले, स्थानिक रहिवाशी यांना विश्वासात न घेता फेरीवाल्यांच्या परस्पर जागा निश्चित करणे ही खेदजनक बाब आहे, असे रहिवाशांनी सांगितले आहे. तर, आम्ही कष्टकरी असून पिढ्यानं पिढ्या इथे व्यवसाय करत आहोत आमचे अन्यत्र स्थलांतर झाल्यास व्यवसायावर परिणाम होईल पालिकेच्या या कठोर कायद्यापेक्षा इंग्रज बरे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक फेरीवाल्यांनी दिली आहे.तर, निवासी क्षेत्र, शाळा, कॉलेज व रुग्णालय याठिकाणी फेरीवाले असू नयेत असे नियम असताना देखील पालिकेकडूनच नियमांची पायमल्ली होताना दिसून येते असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -