घरमुंबईलघुशंकेसाठी त्याने चक्क लोकलच थांबवली

लघुशंकेसाठी त्याने चक्क लोकलच थांबवली

Subscribe

या प्रकारामुळे रेल्वे सेवा काही काळ खोळंबल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारा त्रास हे तर मुंबई लोकल रेल्वेचे नेहमीचं ठरलेलं समीकरण आहे. त्यात पावसाळ्याच्या दिवसात रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी तुंबल्याने, रूळांना तडे गेल्याने लोकल मध्येच थांबविण्यात आल्याचे आपण आतार्यंत ऐकले आहे. मात्र लघुशंकेकरिता धावती लोकल मध्येच थांबविण्यात येण्याचा प्रकार आजपर्यंत ऐकीवात आला नसेल. पण उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान लघुशंकेसाठी मोटरमनने लोकल ट्रेन थांबल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेन थांबवून मोटरमनने चक्क रुळावर उतरून लघुशंका केली. त्यामुळे लोकल प्रवाशांचा खोळंबा झाला. त्या ठिकाणी कोणताही सिग्नल नसताना लोकल अचानक मध्येच का थांबली असावी? असा विचार प्रवासी करु लागले. मात्र थोड्याच वेळात याबाबतचा व्हिडीओ उल्हासनगर शहरातील सोनू शिंदे या तरुणाने सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उल्हासनगरमध्ये तरुणीचे अपहरण करणारा अटकेत

एरव्ही स्वच्छ अभियानाचे धडे शिकवणारे प्रशासन आणि रुळावर लघुशंका व शौचास बसणाऱ्या सर्वसामान्य जनतेकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र रेल्वे प्रशासनास आपल्या कर्मचाऱ्यास नैतिक ज्ञान देण्याचा कदाचित विसर पडला असावा. हे कृत्य अतिशय लाजिरवाणे असून यात सार्वसामान्य चाकरमानी रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची चर्चा सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -