घरताज्या घडामोडीBMC Budget 2020 : पंपिंग स्टेशन उभारणीऐवजी गेट पंप्स बसवणार

BMC Budget 2020 : पंपिंग स्टेशन उभारणीऐवजी गेट पंप्स बसवणार

Subscribe

मुंबईमधील जागेची मर्यादा लक्षात घेता पर्जन्य जलवाहिन्यांवर भरतीचा प्रभाव कमी करण्यासाठी व खोलगट भागात पाणी साचण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पातमुखांवर गेट पंप्स बसवण्यात येणार आहे.

मुंबईमधील जागेची मर्यादा लक्षात घेता पर्जन्य जलवाहिन्यांवर भरतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि खोलगट भागात पाणी साचण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पातमुखांवर गेट पंप्स बसवण्यात येणार आहे. अशाप्रकारचे पंप्स बसवल्यास तिवरांची झाडे तोडण्याची आणि पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी जागेची गरज भासणार नाही.

जलवाहिन्यांच्या कामांसाठी ९१२.१० कोटी रुपयांची तरतूद

- Advertisement -

मुंबईतील विविध पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात ९१२.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील रखडलेल्या मोगरा आणि माहुल येथील पंपिंग स्टेशनसाठीची जमिन संपादन केल्यानंतर पंपिंग स्टेशनची कामे सुरु करण्यात येतील. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इर्ला नाला आणि लव्हग्रोव्ह नाल्यावर बॅक रेक स्क्रिन्स बसवण्यात येणार आहे.

पुराचे पाणी रोखण्यासाठी जायका प्रकल्प

- Advertisement -

पुराचे अतिरिक्त पाणी साठवणे तसेच वळवणे या कामासाठी भूमिगत बोगदे आणि भूमिगत जलशय बांधण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जायका प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प कामांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कामाच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्या आहेत. तर मिठी नदीच्या सौंदर्यीकरणाचा आणि मलनि:सारण समस्येचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चार टप्प्यांमध्ये ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये टप्पा एकमध्ये बिनपावसाळी प्रवाह वळवण्यासाठी इंटरसेप्टरचे काम करण्यात येणार आहे. यासाठी १३० कोटींची कामे केली जाणार आहे.

भाग दोनमध्ये फिल्टरपाडा ते सीएसटी रोड येथे मलनि:सारण वाहिनी टाकण्यासाठी ३४५ कोटी, तर भाग तीन मध्ये फ्लडगेटसह इंटरसेप्टर बांधकाम आणि नदीची उर्वरीत संरक्षक भिंत, सेवा रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च तर भाग चारमध्ये बापट नाला आणि सफेद पूल ते घाटकोपर वेस्ट वॉटर ट्रिटमेंट फॅसिलिटी पर्यंत नवीन बोगद्याचे काम आहे. त्यासाठी २०० कोटी रुपयांचा खर्च आहे. यासर्व कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नालेसफाईसाठी : १३८ कोटी रुपये तर पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी १५० कोटी रुपये देण्यात आले आहेत.


हेही वाचा – BMC Budget 2020 : उद्यान विभागासाठी २५४ कोटींची तरतूद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -