घरमुंबईखुशखबर! मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना मिळवून देणार रोजगार

खुशखबर! मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना मिळवून देणार रोजगार

Subscribe

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजात इंजिनीअरिंग, विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कॉलेजांमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ विविध कॉलेजांमध्ये तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि इन्फोसिस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २०२० मध्ये बी.ई., बी.टेक., एम.ई., एम.टेक., एम.सी.ए, एम.एस्सी. अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार ३ लाख ६० हजार रुपायांपर्यंतचे पॅकेज

मुंबई विद्यापीठ आणि इन्फोसिस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नोकरी शिबिरातून निवडण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ३ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळणार आहे. सायन येथील के. जे. सोमय्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेश उकरंडे आणि ठाणे येथील ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. उत्तम कोळेकर यांनी हे शिबिर आयोजित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे शिबिर तीन दिवस चालणार आहे. आज म्हणजे १५ ऑक्टोबरला ठाण्यातील ए.पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पहिले शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबरला दुसऱ्या दिवसाचे तर १७ ऑक्टोबरला ए.पी. शाह कॉलेजमध्ये शिबिर होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे – शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -