घरमुंबईमुंबईत 'या' ठिकाणी १०० टक्के पाणीकपात

मुंबईत ‘या’ ठिकाणी १०० टक्के पाणीकपात

Subscribe

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे.

मुंबई महापालिकेच्या पवईतील एल अँड टी कपाउंड येथील तानसा पश्चिम या १८०० मिली व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी ६ जून रोजी हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवारी सकाळी दहा वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत धारावी आणि जोगेश्वरी-अंधेरी पूर्व भागातील १०० टक्के पाणीकपात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे. ऐनी उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे.

या भागात होणारा पाणीकपात

अंधेरी जोगेश्वरी पूर्व

एमआयडीसी, ट्रान्स रेसिडेंन्सी, सुभाष नगर, सरीपुत नगर, विजय नगर, पोलिस कॅम्प, मरोळ गावठाण, मिलिटरी रोड, भवानी नगर, चिमटपाडा, सगबाग, मकवाना रोड, ओम नगर, सहार गाव, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, इस्लामपुरा, पारशीवाडा, चकाला गावठाण, जे.बी.नगर, मुळगाव डोंगरी, बामणवाडा, कबीर नगर, लेलेवाडी, टेक्निकल विभाग

- Advertisement -

धारावी:

प्रेमनगर, नाईक नगर, जासमिन मिल रोड, ९० फूट रोड, एम.जी.रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास रोड, काळा किल्ला,,माटुंगा लेबर कॅम्प, धारावी मेन रोड, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, कुभारवाडा, ए.के.जी नगर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -