घरमुंबईहत्या करुन प्लास्टिकच्या गोणीत भरुन मृतदेह टाकला खाडीत

हत्या करुन प्लास्टिकच्या गोणीत भरुन मृतदेह टाकला खाडीत

Subscribe

भिवंडी ठाणे रस्त्यावरील काल्हेर येथील खाडीच्या पात्रात एका प्लॅस्टिकच्या गोणीत अनोळखी इसमाची हत्या करुन विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह खाडीत फेकून दिल्याचे आढळून आले आहे.

काल्हेर गावातील संतोष कटकमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास काल्हेर खाडीत नारळ विसर्जनासाठी गेले होत. त्यावेळी त्यांना खाडीच्या उथळ पाण्यात एका प्लास्टिक गोणीतुन मानवी पाय बाहेर आलेले दिसले. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ नारपोली पोलिसांना कळवली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धावघेत पाहणी केली. दरम्यान, त्या गोणीमध्ये पुरुष जातीचे शव हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्यात टाकल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे .

बांगलादेशी नागरिकास अटक

भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायात असंख्य परप्रांतीय रोजगारा निमित्त वावरत असतात. याच संधीचा फायदा उठवीत असंख्य बांगलादेशी नागरिक भिवंडीत वास्तव्यास आहेत. अशाच एका ६० वर्षीय बांगलादेशी नागरिकास शहर पोलिसांनी अटक केली आहे . अफसरुद्दिन नुरमोहम्मद अन्सारी असे अटक केलेल्या नागरिकाचे नाव आहे . शहरातील बाबला कंपाऊंड येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या या इसमास हनुमान टेकडी या परिसरात रात्रीच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान चौकशी करीत थांबवीले. चौकशीनंतर तो बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी परकीय नागरिक कायदा कलम आणि भारतीय पारपत्र अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

- Advertisement -

बांग्लादेशी बारबालांना अटक

काही दिवसांपूर्वीच भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आणि पथकाने धडक कारवाई करत भिवंडीच्या वळ येथील अतिश बारवर छापा टाकून ४ बांग्लादेशी बारबालांना अटक केली होती. रिहाना उर्फ पिंकी मंडोळ, मीना उर्फ सोनिया मंडोळ, फरीदा सरदार, फजीला शेख या चार बांग्लादेशी बारबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चारही बारबाला घुसखोर बांग्लादेशी नागरिक असून यांनी कोणत्याही वैध प्रवाशी कागदपत्रांशिवाय अवैध मार्गाने भारत-बांग्लादेश सीमेवरून लपतछपत भारतीय सरहद्दीमध्ये प्रवेश केला. भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या अनधिकृतपणे वास्तव्य करीत होत्या. दरम्यान, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -