नाशिकच्या तरूणाचा काश्मीर ते कन्याकुमारी रेकॉर्ड ब्रेकिंग सायकल प्रवास

३६०० किलोमीटरचा पल्ला गाठला अवघ्या ८ दिवस, सात तास आणि ३८ मिनिटात

Om mahajan

नाशिकच्या एका मुलाने चक्क काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर अवघ्या ८ दिवसात सायकलवर पार करण्याची कमाल केली आहे. सायकल चालवण्याचा देशातला सर्वात वेगवाग अशा प्रवासापैकी एक प्रवास आहे. देशातला सर्वात वेगवान सायकल चालवण्याचा रेकॉर्डही या नाशिकच्या १८ वर्षीय ओम महाजनने आपल्या नावावर केला आहे. ओम महाजनने ३६०० किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ दिवस, सात तास आणि ३८ मिनिटात पुर्ण केले. शनिवारी (२१ नोव्हेंबरला) दुपारी त्याने हा विक्रम पुर्ण केला.

मी रेस अक्रॉस अमेरिका (RAAM) मध्ये सहभागी होण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तयारी सुरू केली होती. गेल्या सहा महिन्यापूर्वी मी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली होती. नोव्हेंबरमध्ये ६०० किलोमीटर क्वालिफायर राईडमध्ये सहभागी झाल्यानंतर मी भारतातील रेसिंगसाठी तयारी करण्याचे ठरविले. गेल्या आठवड्यातच एन थंडीत श्रीनगरहून मी माझ्या सायकल प्रवासाला सुरूवात केली. दरम्यान मध्य प्रदेशात झोडपून काढणारा पाऊस आणि दक्षिणेतला उन्हाचा कडाका असा माझा प्रवास झाला. सध्याचा श्रीनगर ते कन्याकुमारी असा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विक्रम हा माझ्या काकांच्या नावे म्हणजे महेंद्र महाजन यांच्या नावे आहे. पण हा विक्रम नुकताच भारतीय सेनेच्या लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यांनी मोडला होता. त्यांनी आट दिवस ९ तास सायकलिंग करून हा विक्रम मोडला. त्यामुळेच मी या विक्रमावर लक्ष केंद्रीत करून हा पल्ला पार करायचे लक्ष ठेवले होते.

झोपण्यासाठी वेळ नव्हता ना विश्रांतीसाठी अशातच मी कडाक्याच्या थंडीतही सायकलिंग करतच राहिलो. मी शनिवारी मी माझे टार्गेट पुर्ण केले. ओम महाजनच्या या विक्रमानंतर सायकलिस्ट कम्युनिटीने सोशल मिडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला. लेफ्टनंट कर्नल पन्नू यांनीही ओमचे अभिनंदन केले आहे. यंदाच्या कोरोनाच्या संकटामुळे माझे अमेरिकेतील क्रीडा व्यवस्थापनाची पदवी शिक्षण रखडले आहे. पण याचा वापर मी स्वतःला प्रशिक्षण देण्यासाठी केला आहे असेही ओमने स्पष्ट केले. या संपुर्ण प्रवासात त्यांच्या सोबत त्याचे वडील, काका आणि सोलो फिनिशर असलेल्या कबीर रायचूर यांचीही सपोर्ट टीम म्हणून साथ मिळाली. ओमच्या वडिलांनी आणि काकांनी याआधी २०१५ मध्ये RAAM ही स्पर्धा जिंकली आहे. त्यांच्या नावे सुवर्ण चतुर्भुज पार करण्याचा विक्रमही आहे.