CoronaVirus : घरोघरी गॅस सिलेंडर पोहचवणे बंद, गॅस एजन्सीजवळ गर्दी वाढली

Mumbai
lpg gas cylinder line

महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊन केल्यापासून घरोघरी सिलेंडर आणून देण्याची सेवा बंद झाली आहे. आॅफिसजवळ येऊन
गॅस सिलेंडर घेऊन जा, असे गॅस एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडर घेणाऱ्यांची रीघ लागली असून त्यामुळे करोनाचा धोका अधिकच वाढला आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने सोमवारपासून राज्यात लॅाकाडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र, सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहतील, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. ती दुकानेही सुरू आहेत.

पूर्वसूचना न देता डिलीव्हरी बंद!

मात्र, घरात सर्व वस्तू असल्या तरी त्या शिजवणार कशा? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना सतावत आहे. त्याला कारण म्हणजे भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा कंपन्यांच्या गॅस एजन्सीने घरोघरी सिलेंडर सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली आहे. मागील सोमवारपासून घरोघरी सिलेंडर देणे आता बंद झाले आहे.घरात सिलेंडर येत नसल्यामुळे नागरिकांनी रिकाम्या सिलेंडरसह गॅस एजन्सीच्या कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे. ही गर्दी इतकी आहे की, त्यामुळे जमावबंदीचे आदेश धुडकावले गेले असून करोनाचा धोका वाढला आहे.

माणसं नाहीत तर काय करणार?

याबाबत एचपी गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता सुरुवातीला त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र तरीही पिच्छा पुरवल्यावर ‘आमच्याकडे माणसे नाहीत तर घरोघरी सिलेंडर कशी पोहचवणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘इथे येऊन गॅस घेऊन जा’, असेही सांगण्यात आले. गॅस हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असतानाही तो घरी येत नाही. पुन्हा घरातून सिलेंडर घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे सध्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.


CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद? गोंधळ उडालाय? इथे वाचा!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here