घरमुंबईचिमुकल्याने दिला आईला अग्नी, आणि सगळेच हेलावले

चिमुकल्याने दिला आईला अग्नी, आणि सगळेच हेलावले

Subscribe

सीएसएमटी पूल दुर्घटनेत परिचारिका भक्ती शिंदे यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. हा अंत्यसंस्कार त्यांच्या १४ वर्षीय मुलाने केला आहे.

मुंबईतील सीएसएमटी बाहेरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीटी रूग्णालयातील परिचारिका भक्ती शिंदे यांचाही मृत्यू झालाय. शुक्रवारी भक्ती यांच्यावर डोंबिवलीतील शिवमंदिर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडले. १४ वर्षीय ओमकारने आईच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंगाने सगळयांचीच मनं हेलावून गेली. अनेकांना हुंदका आवरना नाही. तर अनेकांचे डोळे अश्रूंनी तरळले.

मुलाने दिला अग्नी

डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोड येथील ओमसाई दत्त बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या भक्ती शिंदे या पती. सासू आणि १४ वर्षीय मुलगा ओमकारसह राहत होत्या. सीएसएमटीच्या पूल दुर्घटनेत त्यांचा हकनाक बळी गेल्याने त्यांच्या कुटूंबिय आणि नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ओमकारही आईच्या आठवणीने रडत आहे. ओमकार हा सेंट मेरी शाळेत आठवीत शिकत आहे. प्रसंग म्हणजे काय पुसटशी कल्पना नसलेल्या बालवयातच ओमकारला भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. हे पाहून प्रत्येकाच्या डोळे अश्रूंनी भरले होते. संसारात पत्नी मोलाचा हातभार होता. संसाराचं एक चाकं निखळल्याने पती राजेंद्रही ढसाढसा रडत होते. राजेंद्र हे सेल्समन आहेत. मात्र घराचा गाढा त्यांच्या पत्नीच सांभाळीत असत. अतिशय मेहनती आणि प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. इमारतीतील रहिवाशांच्या कोणत्याही अडचणीसाठी त्या धावून जात. इमारतीत कोणीही आजारी असेल तर स्वत: घरी जावून तपासणीही करीत असत असं त्यांच्या शेजारी समीक्ष कोयंडे यांनी सांगितलं. देान दिवसांपूर्वीच त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. तेवढीच त्यांची शेवटची भेट असे त्यांच्या शेजारी सीमा शिंदे यांनी सांगितलं. आजरी असतानाही त्या घरी कधीच थांबत नसत. रूग्णांची सेवा करण्याची त्यांना खूप आवड होती. त्यामुळे कधीही सुट्टी न घेता नोकरीला जात असेही शिंदे यांनी सांगितलं.

- Advertisement -

पैसे देऊन माणूस परत येईल का? संतप्त भावना

पूल दुर्घटनेत सामान्य प्रवाशांचा बळी गेल्याने मृतांच्या नातेवाईकांकडून सर्वत्रच संताप व्यक्त केला जात आहे. मृत्यांना सरकारकडून पाच लाखाची मदत जाहिर केलीय. मात्र पैसे देऊन माणूस परत येणार का ? अशी संतप्त भावना शेजारी सीमा शिंदे यांनी आपलं महानगरकडे व्यक्त केली. घरातून नोकरीसाठी बाहेर पडलेला माणूस परत घरी परतेल का नाही याची भिती वाटते. अशी अवस्था झाली आहे. प्रवासी लेाकलमधून खाली पडून, पुल पडून मरताहेत हा कसला कारभार ? सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. असा संताप शिंदे यांनी व्यकत केला. अमेरिकंच कौतूक करतात पहिले देश सुधारा, असे खडेबोलही त्यांनी राजकारण्यांना सुनावले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -