घरमुंबईओमी कलानींच्या भाजपा प्रवेशास राज्यमंत्र्यांचा खो

ओमी कलानींच्या भाजपा प्रवेशास राज्यमंत्र्यांचा खो

Subscribe

उल्हासनगरातून कुमार आयलानींसाठी रविंद्र चव्हाण यांची फिल्डिंग

ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उल्हासनगरातील भाजपा उमेदवारीसाठी पप्पू कलानींचे पुत्र टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यात कुमार आयलानींच्या उमेदवारीसाठी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे वजन खर्ची घातल्याने ओमी कलानींच्या भाजपा प्रवेशाचे स्वप्न भंगले आहे.उल्हासनगर हा परंपरागत पप्पू कलानींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतही पप्पू कलानींच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी या भाजपाच्या विजयी लाटेतही कुमारआयलानींचा पराभव करून निवडून आल्या होत्या. त्यामुळे भाजपाला यंदा उल्हासनगरचा गड सर करताना पप्पू कलानी आणि राष्ट्रवादी यांच्यांशी पंगा घ्यावा लागणार आहे. उल्हासनगरात 1986 पासून पप्पू कलानी यांचा राजकीयवरचष्मा आजतागायत कायम आहे.

त्यामुळेच यंदा उल्हासनगरातील स्थानिक भाजपा नेत्यांनी कलानींना पराभवाचे खडे चारण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्याला पाठबळ मिळाले आहे ते राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे.उल्हासनगरात कुमार आयलानी आणि पप्पू कलानी यांच्यात नेहमीच राजकीय हाडवैर राहिले आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने जिल्हाध्यक्ष कुमारआयलानी यांच्या पत्नीला महापौर करण्यासाठी पप्पू कलानीप्रणित टीम ओमी कालानी बरोबर युती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही युती झाली होती. त्यानुसार कुमार आयलानीनंतर ओमी यांच्यापत्नी पंचम कलानी यांना महापौर करण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युतीचा हा फार्म्युला कायम राहील असे बोलले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसातील उल्हासनगरातील राजकीय घडामोडी पाहता ओमी कलानींच्या भाजपा प्रवेशाला कुमार आयलानी सुरुंग लावण्यात यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -