घरठाणेदोन कोटींच्या कर्जासाठी १ कोटीची ऑनलाईन फसवणूक

दोन कोटींच्या कर्जासाठी १ कोटीची ऑनलाईन फसवणूक

Subscribe

दोन कोटीचे कर्ज मिळवण्यासाठी दोन बड्या फायनान्स कंपन्याच्या नावाखाली एका फार्मासिटीकल कंपनीच्या उपाध्यक्षाची एक कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील पोखरण येथील ही घटना आहे.

ठाण्यातील पोखरण येथील वसंत विहार येथे राहणारे ५१ वर्षीय गृहस्थ हे वागळे इस्टेट येथील एका फार्मासिटीकल कंपनीचे उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) आहे. त्यांच्या घरी येणाऱ्या इंग्रजी सांज दैनिकात ‘पारस फायनान्स गव्हर्टमेन्ट अँप्रुव्हल मार्कशिट, अग्रीकल्चर, बिझनेस,पर्सनल लोन २४ तासात मिळेल’ अशी जाहिरात छापून आली होती. ही जाहिरात वाचून तक्रारदार यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता सुनील चव्हाण नावाच्या कथीत व्यक्तीने फोन उचलला. तक्रारदार यांनी कर्जाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी दिलेल्या Whats app क्रमांकावर त्यांची कागदपत्रे पाठवली. कागदपत्रे बघून दोन कोटीचे कर्ज मंजूर होईल असे त्यांना सांगण्यात आले व वेगवेगळ्या फी च्या नावाखाली तक्रारदार यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर १४ लाख रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढील रक्कम भरली नाही. व पारस या कंपनीचा नाद सोडून दिला.

- Advertisement -

कर्जाची नितांत गरज आल्यामुळे तक्रारदार यांनी एका बड्या फायनान्स कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्या ठिकाणी देखील या प्रकारे त्यांची ८७ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या दोन्ही कथीत फायनान्स कंपनीने मिळून ५१ वर्षीय तक्रारदार यांची सुमारे एक कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी ठाण्यातील मानपाडा चितळसर या पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. सोमवारी चितळसर पोलिसांनी याप्रकरणी दोन कथीत फायनान्स कंपन्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -