घरमुंबईपरमबीर सिंह एसीबीचे महासंचालक

परमबीर सिंह एसीबीचे महासंचालक

Subscribe

पोलीस आयुक्तपदाची वाट सुकर

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांना पदोन्नती देऊन त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी दुपारीच परमबीर सिंह यांनी या विभागाचा कार्यभार सांभाळला.

१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे परमबीर सिंह राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत होते. सध्या मुंबई पोलीस आयुक्त असणारे संजय बर्वे यांच्यासह परमबीर सिंह मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र सेवाजेष्ठतेनुसार बर्वे यांची आयुक्तपदी वर्णी लागली. बर्वे हे मुंबई पोलीस आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर राज्य शासनाने अपर पोलीस महासंचालक असलेले परमबीर सिंह यांना पदोन्नती देत त्यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी केली. शनिवारी दुपारीच परमबीर सिंह यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे येत्या ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होतील, मात्र यादरम्यान विधानसभा निवडणुका असल्याकारणाने बर्वे यांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या सेवानिवृतीनंतर परमबीर सिंह हेच मुंबई पोलीस आयुक्तपदाचे दावेदार आहेत. शासनाने परमबीर सिंह यांना बढती देऊन त्यांची रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केली. अशा प्रकारे त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची वाट सुकर करून दिली, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -